अकोला – नेहरू पार्क जवळील जय शंकर हॉटेल मध्ये सुरु असलेल्या अवैध दारूच्या सार्वजनीक अड्ड्यावर पोलीस अधीक्षक अकोला यांच्या विशेष पथकाने कारवाई केली असून एकूण १९ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.एकूण ३,९४,३५०/-रू चा मुद्देमाल जप्त.
अकोला शहरात पेट्रोलींग करीत असता रात्री ७ वा सुमारास नेहरू पार्क अकोला येथील जय शंकर हॉटेल अकोला या ठिकाणी यातील हॉटेल चालक हा अवैद्यरित्या देशी विदेशी दारू बाळगुण विक्री करूण हॉटेलवर येणा-या गि-हाईकाला दारू पिण्या करीता जागा उपलब्ध करूण देवून त्यांचे आर्थीक फायद्या करीता सार्वजनिक दारूचा गुत्ता चालवित आहे.
अशी माहीती मिळाल्या वरूण नेहरू पार्क येथील जय शंकर हॉटल मधे धाड टाकली असता त्या ठिकाणी टेबल खुर्चीवर बाकड्यार बसुन काही ईसम हे दारू पित असतांना दिसुन आले दारू पित असलेल्या ईसमांना त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नावे १.सुनील हशमतराय फतनानी वय ४० वर्षे रा.सिंधी कॅम्प अकोला २.अहमद खान युसूफ खान वय २८ वर्षे रा.नुराणी मशीद जवळ खदान अकोला३.जयकूमार हशमतराय फतनानी वय ३६ वर्षे रा.कच्ची खोली सिंधी कॅम्प अकोला.
अजहर खान फरीद खान वय ३२ वर्षे रा.बैदपूरा अकाला५.अनवर खान आबीद खान वय ३७ वर्षे रा.नुराणी मशीद जवळ खदान अकोला६.सदाम खान रसूल खान वय २८ वर्षे रा.बैदपूरा अकोला७.महेश रेवाचंद फतनाणी वय ३८ वर्षे रा.कच्ची खोली सिंधी कॅम्प अकोला८.समीर खान मोहमंद अख्तर खान वय २० वर्षे रा.लाल बंगला बैदपूरा अकोला ९.शेख अजीम शेख रहीम वय ३१ वर्षे रा.जिरा बावडी इस्लाम चौक खदान अकोला१०.
इस्लामोद्दीन सलामोद्दीन वय २९ वर्षे रा.जिरा बावडी उपदान अकोला११.साजन ताराचंद जेठाणी वय४० वर्षे रा.पक्की खोली सिंधी कॅम्प अकोला१२.वैभव ज्ञानेश्वर उमक वय २८ वर्षे रा.लोकमान्य नगर, शिवसेना वसाहत अकोला१३.महेंद्र नानकराम नानवाणी वय ४२ वर्षे रा.पक्की खोली सिंधी कॅम्प अकोला १४. मोईनोद्दीन इजाजोद्दीन वय २५ वर्षे रा.जिरा बावडी खदान अकोला१५.संतोष नामदेवराव खडसान वय ४८ वर्षे रा. व्ही एच बी कॉलनी अकोला१६.अनीस शेख खालीद शेख वय ४२ वर्षे रा.उत्तरचंद प्लॉट तार फाईल अकोला
१७.नरेंद्र बाबूलाल गंगाधरे वय ४५ वर्षे रा.व्ही एच बी कॉलनी तारफाईल अकोला१८.संजय केशवराव म्हैसने वय ४४ वर्षे रा. तारफाईल भवानी पेठ अकोला असे सांगितले, त्याचे टेबलवरील असलेले अर्धवट विदेशी दारूचे कॉटर तसेच हॉटेल च्या काउन्टर वर असलेल्या इसमास त्याचे नाव गाव विचारले असता त्यांने त्यांचे नाव १९.लखमीचंद शंकरलाल रोहडा वय ५९ वर्ष रा.कच्ची खोली सिंधी कॅम्प अकोला असे सांगितले.
नमूद ठिकाणी आरोपीतांकडून अवैध देशी व विदेशी दारू, लाकडी टेबल, प्लॉस्टी खुर्व्या, विविधी कंपण्याचे मोबाईल, मोटर सायकली असा एकूण३,९४,३५०/-रू चा माल मिळुण आला. नमुद हॉटेल चालक नामे लखमीचंद शंकरलाल रोहडा वय ५९ वर्ष रा.कच्ची खोली सिंधी कॅम्प अकोला यांने त्यांचे हॉटल मधे अवैद्यरित्या देशी विदेशी दारू बाळगुण विकी करूण हॉटल मधे लोकांना दारू पिण्याकरीता सुविधा उपलब्ध करूण स्वत:चे आर्थीक फायद्या करीता सार्वजनिक दारूचा गुत्ता चालवून शासनाने निर्धारीत केलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ हॉटेल चालु ठेवले.
तसेच दारूच्या गुत्ता मधे दारू पिण्या करीता आलेल्या ईसमांविरुध्द पो स्टे खदान येथे महाराष्ट दारूबंदी कायदयान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नमूद कारवाई मा.श्री.जी.श्रीधर पोलीस अधीक्षक अकोला, मा.श्री.प्रशांत वाघुडे, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंदकूमार अ.बहाकर पोलीस निरिक्षक विशेष पथक अकोला यांनी व त्यांच्या पथकाने केली आहे.