अकोट (देवानंद खिरकर)- पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. कोरोना महामारीचे काळात समाजात जनजागृती करीता कोरोना योध्दा म्हणून काम करीत आहे.त्यामुळे त्यांच्या आरोग्याचे काळजी व मदत शासनाने करावी. पत्रकारांना आरोग्य सुरक्षा प्रदान करण्याची मागणी करीत
याकरीता पत्रकार राज्यभर निवेदन देण्यात येत आहे.या संदर्भात अकोट तालुका पत्रकार संघाने १८ संप्टेबर रोजी अकोट तहसीलदार यांना निवेदन दिले.महाराष्ट्र मराठी पत्रकार परिषद मुंबई सलग्न अकोला जिल्हा पत्रकार संघ मार्फत विविध मागण्यासाठी आदोलन करण्यात येत आहे.आरोग्यमंत्री यांनासुध्दा एसएमएस करो आंदोलन करण्यात आले.यामध्ये कोरोना मुळे मुत्यु पावलेल्या पत्रकाराच्या कुटुंबीयाना शासनाने ५० लक्ष रुपयाची मदत करावी, कोरोना काळात विमा संरक्षण दयावे,दिव्यांगत पत्रकार संतोष पवार, व पाडुरंग रायकर यांच्या मुत्यूची चौकशी करावी.कोव्हीड हॉस्पीटल मध्ये पत्रकार साठी बेड राखीव ठेवण्यात यावे.अशा आशयाचे निवेदन अकोट तालुका पत्रकार संघा तर्फ देण्यात आले.यावेळी अकोला जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हा सचिव विजय शिंदे, तालुका अध्यक्ष हरिओम व्यास, तालुका पत्रकार संघाचे सचिव मंगेश लोणकर,पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रामदास काळे, ज्येष्ठ पत्रकार किर्ती कुमार वर्मा, तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष कमलकिशोर भगत, सदस्य वामन जकाते, रमेश तेलगोटे, रवींद्र इंगळे यांच्यासह पत्रकार उपस्थित होते