• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जिल्हा परिषद सदस्य संजय अढाव यांची तत्परता हिंगणी बु येथील आगीत नुकसान झालेल्या महिलेला दिला मदतीचा हात

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
September 15, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
77 1
0
जिल्हा परिषद
16
SHARES
556
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा(प्रतिनिधी)- आज दुपारी तालुक्यातील हिंगणी बु येथील एका घरात सिलेंडरने पेट घेतल्याने जवळपास सात ते आठ घरांना या आगीच्या भस्मात सापडली होती आर्थिक नुकसान झाल्याने बेलखेड जिल्हा परिषद सदस्य यांनी मदतीचा हात देऊन तत्परता यावेळी दाखवली.

सविस्तर असे की तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हिंगणी बु. येथील श्रीमती मंगलाबाई शेषराव कोरडे या महिलेच्या घरी मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या दरम्यान स्वयंपाकासाठी गॅस सुरू केला असता इंडेन सिलेंडर ने अचानक पेट घेतला सिलेंडर ने पेट घेतल्याचे पाहताच एकच धावपळ उडाली. मंगलाबाई कोरडे यांच्यासहित शेजाऱ्यांनी आरडाओरड केला आणि घराबाहेर पळाले त्यामुळे सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नाही. थोड्याच वेळात पेटलेल्या सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. ज्यामुळे मोठा धमाका झाला जणू काही मोठा बॉम्बस्फोट झाला असावा अशी परिस्थिती झाली होती. सिलेंडरचा स्फोट होताच
गावकऱ्यांनी आग विझविण्यासाठी धाव घेतली आणि युवकांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मंगलाबाई कोरडे यांच्या घरासह शेजारील माणिकराव सदाशिव कोरडे आणि गोपाल विश्वनाथ कोरडे अशा एकूण तीन घरातील संपूर्ण मुद्देमाल जळून खाक झाला आणि तिन्ही घरे राहण्यास योग्य राहिली नाहीत. मंगलाबाई च्या घरातील रोकड पन्नास हजार रुपये, जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या दोन क्विंटल गहू, तांदूळ, ज्वारी, डाळी, रेशन कार्ड, बँक पासबुक, इत्यादि सर्व नामशेष झाले. मंगला बाई सोबतच दोन्ही शेजाऱ्यांच्या घरातील संपूर्ण साहित्य भस्मसात झाले आहे. त्यामुळे तिन्ही कुटुंब उघड्यावर आले आहेत. आग लागल्यानंतर तेल्हारा अग्निशमन दल घटनास्थळावर दाखल झाले आणि आग विझविण्यास पुढाकार घेतला. हिवरखेड पोलीस घटनास्थळी पोहोचली आणि तलाठ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. सिलेंडर स्फोटामुळे लागलेल्या आगीत भयावह नुकसान झाल्याने सदर नुकसानग्रस्त कुटुंबांना तातडीने भरीव आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे. यावेळी बेलखेड जिल्हा परिषद सदस्य यांनी माणुसकी दाखवत श्रीमती मंगला शेषराव कोरडे यांना हिंगणी बु गाठून पाच हजार रुपयांची आर्थिक मदत केली.यावेळी उपसरपंच ज्ञानेश्वर कोरडे, पंचायत समिती सदस्य संजय लांडे, सुधाकर हागे, विनोद गावंडे ,अनिल तायडे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: जिल्हा परिषद
Previous Post

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अनुभवलेली”निगरगट्ट रात्र”

Next Post

विविध समस्यांसाठी तेल्हारा न प दालनात नागरिकांचे ठिय्या आंदोलन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
आंदोलन

विविध समस्यांसाठी तेल्हारा न प दालनात नागरिकांचे ठिय्या आंदोलन

जितेंद्र पापळकर

कोविड-19 च्या अनुषंगाने खाजगी रुग्णालयाचा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी घेतला आढावा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.