तेल्हारा (प्रतिनिधी)महाराष्ट्रात कोरोना मुळे मृत्यू पावलेल्या पत्रकारांच्या स्मृतीत संपूर्ण राज्यात ३५ जिल्हा पत्रकार संघ व ३५० तालुका पत्रकार संघा तर्फे श्रद्धांजली सभा आयोजित करून शोक व्यक्त करण्याचे आवाहन पत्रकारांची शीर्ष संघटना मराठी पत्रकार परिषद मुंबई यांनी केलेले आहे , त्यानुसार अकोला जिल्हा पत्रकार संघाची शाखा तेल्हारा तालुका पत्रकार संघाच्यावतीने दि. ११ सप्टेंबरला दुपारी ३.३० वाजता क्रीडा संकुल येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष प्रल्हादराव ठोकणे, कार्याध्यक्ष सत्यशील सावरकर, उपाध्यक्ष अनंत अहेरकर, रामभाऊ फाटकर, कोषाध्यक्ष सदानंद खारोडे, प्रसिद्धीप्रमुख धर्मेश चौधरी, प्रा. विद्याधर खुमकर, राहूल मिटकरी इत्यादी उपस्थित होते. यावेळी स्थानिक पत्रकार अनिल जोशी यांच्या वडीलांचे निधन झाले त्यांच्या स्मृतील श्रद्धाजंली वाहून शोकव्यक्त करण्यात आला.