बेलखेड चंद्रकांत बेंदरकार दि.05/09/2020 ला.(शिक्षक दिनी) सामाजिक कार्यकर्ते तसेच ह.भ.प.श्री पवन(विकी)पाटील खुमकर यांची विश्व वारकरी संघटना तेल्हारा तालुका अध्यक्ष पदी निवड झाली या पुढे वारकरी सांप्रदायवर होणारे अत्याचार थांबतील व वारकरी सांप्रदायाचे अत्याचार होऊ देणार नाही तसेच माझ्या कडे दिलेले तालुका अध्यक्ष पद वारकरी संघटना च्या नियमा प्रमाणे पूर्ण जबाबदारीने यापुढे पार पाडेल असे त्यानी आपले मत अवर अकोला न्युज ला बोलताना दिले.
तसेच बेलखेड व पूर्ण तेल्हारा तालुक्यांमध्ये आपल्या सामाजिक कामासाठी सदैव तत्पर असणारे पवन पाटील यांनी नुकत्याच झालेल्या हीवरखेड ते आरसूळ राज्यमार्ग वर होणारे रोडचे काम लवकर पूर्ण करावे यासाठी माननीय आमदार श्री.नितीन बापू देशमुख यांच्याकडे आपले निवेदन पत्र सादर केले तसेच त्यांच्याशी बोलताना तालुक्यामधील जनतेवर आतापर्यंत जो अन्याय शासनाने केला त्याच्यावर लक्ष देण्याची मागणी आपल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी मा. आमदार नितीन बापू देशमुख यांच्याकडे जनसंपर्क कार्यालय अकोला येथे केली तसेच तालुक्यामध्ये इतर खेडे तालुक्याशी जनतेशी निगडीत असल्याने तहसीलचे कामाकरिता व विद्यार्थ्यांना कॉलेज ला व शाळा तसेच शेतकरी बांधव शेतीला लागणारे सर्व खत बियाणे तेल्हारा वरून आणावे लागतात तसेच रोड अतिशय पावसाळ्यामुळे खराब झाल्यामुळे संबंधित ठेकेदारांनी व लोकप्रतिनिधी खासदार यांनी रोडचे काम लवकरात लवकर पूर्ण करून जनतेला होणारे त्रास होणार नाही या कडे शासनाने लक्ष दयवे असे पत्र दिले व या पुढे असेच आणखी आदोलन सुरूच ठेऊ असे त्यानी म्हटले.