अकोला,दि.1– राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे शुक्रवार दि. 4 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
शुक्रवार दि. 4 रोजी सकाळी 10 वा. 30 मि. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव, सकाळी 10 वा. 55 मि. जिल्हाधिकारी कार्यालय, अकोलाकडे प्रयाण व सकाळी 11 वा. नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे आगमन व बैठकीत उपस्थिती. सायंकाळी सहा वाजेपर्यंत शासकीय अधिकारी यांचे समवेत खालील विषयावर आढावा बैठक.
१. कृषी व पोखरा अंतर्गत विविध योजनांचा आढावा
२. अपंग निधी खर्च आढावा
३. महिला, मुलींचे आश्रम, वसतीगृहे व इतर समस्यांबाबत आढावा
४. वन्यजीव व वने याबाबत आढावा
५. अकोला थॅलेसिमीया रुग्णांचे समस्यांबाबत आढावा
६. जिल्ह्यातील तालुका स्तरावरील कोविड-19 बाबत आढावा बैठक
बैठकीनंतर सवडीने मुर्तिजापूर मार्गे, जि. अमरावती कडे प्रयाण.