तेल्हारा (प्रतिनिधी)- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव तेल्हारा नगर परिषद च्या वतीने बेलखेड रस्त्यालगत बांधण्यात येत असलेल्या सामाजिक सभागृहाला देण्याबाबत ३१ ऑगस्ट ला सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती तेल्हारा च्या वतीने तेल्हारा नगर परिषद च्या अध्यक्षा व नगरसेवकांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे.
तेल्हारा नगर परिषद च्या वतीने बेलखेड रस्त्यालगत सभागृहाची निर्मिती होत आहे या सभागृहाला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देऊन त्यांनी बारा बलुतेदार व अठरा पगळ जातीच्या लोकांना सोबत घेऊन एक आदर्श राजा म्हणून ख्याती प्राप्त केली रयतेचे सुख दुःख हे आपले समजून सर्वांना समान न्याय देऊन राज्य केले त्यांची प्रेरणा व आदर्श इतरांनी घ्यावा त्यांच्या नावाच स्मरण होऊन सर्वांनी गावाचा कारभार चालावा
या करिता सदर सभागृहाला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे या करिता सार्वजनीक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने तेल्हारा नगर परिषद च्या अध्यक्षा व नगरसेवकांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर शिवजयंती उत्सव समितीचे तालूका अध्यक्ष रोशन अहेरकर , अनिकेत बकाल , मयंक जिंदे , सौरभ खारोडे , आशिष देशमुख , वैभव देशमुख , अभि आसरे , भावेश पवार ,सौरभ सोनोने कृष्णा विखे , किशोर डांबरे , मयूर शेंगोकार , गणेश बोळे , परमा जाधव , वैभव खराटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत .
आमच्या रास्त मागणीचा विचार न केल्यास आम्हाला आंदोलनाचा मार्ग शिकरवा लागेल असा इशारा सुध्दा निवेदनातून देण्यात आला आहे . नगराध्यक्षा व नगरसेवक सदर सभागृहाला नाव देण्याबाबत काय भूमिका घेतात याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.