मूर्तीजापुर (सुमित सोनोने)-कोरोना संक्रमताने प्रत्येक नागरिक संकटाचा सामना करत आहे.अशा परिस्थितीत अनेक शिक्षण संस्था आपले तोंड उघडे करून पालकांना हा त्रास देत आहेत म्हणून यंदा शैक्षणिक शुल्क मागणाऱ्या खाजगी शाळांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष गौरव मोरे यांनी जिल्हाधिकारी कडे निवेदनाद्वारे केली आहे.
संपूर्ण जगात कोरोना महामारी मुळे मोठा संकट सर्वांच्या समोर निर्माण झाला आहे या संकटामुळे बेरोजगारीचा प्रश्न प्रथम क्रमांक वर वाढलेला आहे शासन सुद्धा मोठ्या प्रमाणात आपला घाटा करत आहे तर हे खाजगी शिक्षण संस्था आपल्या मनमानीने मोठ्या प्रमाणात फि ची मागणी करून लोकांना नाहक मानसिक त्रास देण्याचा काम करत आहे शाळेचे व्यवस्थापक वारंवार पालकांना शाळेची फी भरण्यासाठी फोन करून तगादालावत आहे.खाजगी शाळांना शैक्षणिक शुल्क आकारू नये असे शासनाचे आदेश असताना सुद्धा शाळेचे व्यवस्थापक यांच्या दबावाखाली येऊन शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षिका विद्यार्थ्यांना फी मागत आहे सध्या ऑनलाईन चा प्रश्न समोर आल्याने या खाजगी शाळांच्या मार्फत अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास करिता डोळ्यात आले नाही.बऱ्याच विद्यार्थ्यांना संस्थाचालकांच्या मनमानी मुळे उशिराने काही विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास करिता जोडण्यात आले शिक्षणापासून वंचित ठेवणारे असे खाजगी शाळांवर कार्य झालेली कारवाई झाली पाहिजे जर या शाळांनी पुन्हा पालकांना त्रास देऊन फी मागितली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शाळेसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष गौरव मोरे यांनी दिला आहे.