तेल्हारा (प्रतिनिधी)- तालुक्यातील हिवरखेड महसूल मंडळ अंतर्गत तळेगाव खुर्द, येथील कृषी विभागाअंतर्गत पिकाचा उत्पन्नाचा अंदाज घेण्याकरता शेतकऱ्यांच्या शेतात पिक कापणी प्रयोग घेण्यात आला. या दरम्यान कृषी विभागांतर्गत पिकाचा उत्पन्नाचा अंदाज घेण्याकरिता पिक कापणी प्रयोग घेण्यात आले. पिक कापणी प्रयोगाच्या शेतावर प्रत्यक्ष जाऊन कापणी करण्यात आली. यामध्ये श्रीधर मगर व पंचशीला रतन हिवराळे यांच्या शेतात मुग पिकाची कापणी यावेळी सरपंच ग्रामसेवक तलाठी व शेतकरी प्रतिनिधी विमा प्रतिनिधी व कृषी सहाय्यक हजर होते. यावेळी पिकावर व्हायरस आल्यामुळे पिकाचे उत्पन्न एकरी 800 ते 1000 ग्रॅम आले यावेळी मुग पिक पूर्णपणे उडाल्याचे दिसून आले. मुग पिक हे कमी कालावधीचे असल्यामुळे शेतकऱ्यांनी मुग पिकाची काहीप्रमाणात पेरणी केलेली आढळली. यापासून आपल्याला कमी कालावधीत काहीतरी उत्पन्न होईल अशी शेतकऱ्यांची आशा होती. परंतु प्रत्यक्ष पिक पाहणी दरम्यान मूग पिकाचे उत्पन्न बुडाल्याचे आढळून आले. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे हतबल झालेला आहे. पिक कापणी प्रयोगाच्या दरम्यान तेल्हारा तालुक्यातील गावांमधील सरपंच पोलिस पाटील तलाठी कृषी सहाय्यक ग्रामसेवक प्रगतशील शेतकरी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मिलिंद वानखेडे तालुका कृषी अधिकारी तेल्हारा यांनी केले आहे.