• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जिल्ह्यात तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थांची विक्री सुरु

Media Desk by Media Desk
August 22, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
77 1
0
Jitendra Papalkar
12
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.22– तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन करुन सार्वजनिक ठिकाणी थूंकने व धुम्रपान करण्यामुळे कोविड-19 चा प्रसार व पादुर्भाव होवू शकतो. त्यामुळे अशा पदार्थाचे विक्री करण्याऱ्या दुकाने व पाणटपऱ्यांना अटी व शर्तीच्या अधीन राहून सकाळी 9 ते सायं. 7 पर्यंत सुरु करण्याची परवानगी देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहे.

            शासनाचे सक्षम प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशानुसार त्या तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थास बंदी घातलेली आहे. ते पदार्थ विक्री करण्यास किंवा विक्री कराण्यासाठी ठेवण्यास संपूर्ण बंदी असेल. तसेच अशा प्रकारे बंदी घातलेले  पदार्थ विक्री करताना  किंवा विक्री करण्यासाठी ठेवल्याचे आढळल्यास संबधिंतावर सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत दंडात्मक व कायदेशिर फौजदारी कारवाई करण्यात येईल. विक्री करणारे दुकानदार व ग्राहकांनी चेहऱ्यावर मास्क किंवा रुमालचा वापर करणे वंधनकारक आहे, विक्री करणारे दुकानदार किंवा पानटपरी चालक यांनी सामाजिक अंतराच्या (Sccial Distancing ) नियमांचे पालन करण्यात यावे, अशा ठिकाणी दोन व्यक्ती मध्ये कमीत कमी 6 फुटाचे अंतर राखतील तसेच दुकानांमध्ये ग्राहकांनी खरेदी करतेवेळी दुकानदाऱ्यांनी दोन ग्राहकांमध्ये सूरक्षित अंतर राहील याची दक्षता घ्यावी. तसेच एकावेळी पाच पेक्षा जास्त लोक एकत्रीत येणार नाही याची दक्षता घ्यावी.  तसे आढळून न आल्यास याबाबत स्थानिक स्वराज्य संस्था, अन्न व औषधे विभाग, महसूल, पोलीस विभागानी दंडात्मक कारवाई करावी, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास बंदी असून  पानटपरी अथवा दुकानाच्या ठिकाणी ग्राहकांनी धुम्रपान केल्यास अथवा थुंकल्यास संबंधित दुकानदारावर तसेच ग्राहकांवर सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत दंडात्मक व कायदेशिर कारवाई केली जाईल. पानटपरी किवा दुकानांच्या ठिकाणी फक्त तंबाखुजन्य पदार्थ विक्रीस मुभा राहील. तथापि सदरच्या ठिकाणी असे पदार्थ सेवन करणे अनुज्ञेय राहणार नाही. पानटपरी किंवा दुकानांच्या ठिकाणी व कामगारासाठी असणाऱ्या एकत्र सुविधांचे ठिकाणी व सर्व मानवी संपर्क येण्याच्या ठिकाणी उदा. दरवाजे हेन्डल इत्यादी स्वच्छ व संनिटाईज करण्यात यावीत.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

            अकोला शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता 1850 च्या कलम 188 अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येईल व संबंधितावर सदर कलमानुसार कारवाई करण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था, संघटना यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक पेक्षा कमी नाही अशा अधिकाऱ्यांना यापूर्वी निर्गमित केलेल्या आदेशास पुढील आदेशापर्यंत प्राधिकृत करण्यात आलेले असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Previous Post

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 43 चाचण्या, एकही पॉझिटिव्ह नाही

Next Post

कोरोनाची साखळी पुन्हा ग्रामीण भागाकडे,आज २६ जण पॉझिटिव्ह

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
Corona Cases

कोरोनाची साखळी पुन्हा ग्रामीण भागाकडे,आज २६ जण पॉझिटिव्ह

रक्तदान शिबिर

पातुरात मंगेश गाडगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.