तेल्हारा(प्रतिनिधी)- नॅशनल को ऑडीनेशन कमिटी एम्प्लॉइज अँड इंजिनियर च्या आदेशानुसार महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन शाखा तेल्हारा ( आयटक),एस इ ए ,च्या संयुक्त कृती समितीचे वतीने खाजगीकरण ,व विद्यूत कायदा 2020 च्या विरोधात महावितरण उपविभागीय कार्यालय च्या समोर निषेध द्वार सभेचे आयोजन करण्यात आले होते ,यावेळी एस इ ए चे तेल्हारा शाखा प्रमुख इंजि आकाश गुप्ता , वर्कर्स फेडरेशन चे तेल्हारा शाखा सचिव कॉ अफसर शाह यांनी खाजगीकरण, तथा नवीन विद्युत कायदा 2020 मुले कामगार आणि सर्व सामान्य जनतेचं नुकसान आणि भविष्यात या मुळे निर्माण होणाऱ्या अडचणी बाबती द्वार सभेला विस्तृतपणे मार्गदर्शन केले, यावेळी द्वारसभेला इंजि कु कल्याणी गावंडे, कॉ आकाश पाचभाई, अखिल कुमार साहेब, गुहे साहेब सहित वर्कर्स फेडरेशन चे तेल्हारा शाखा अध्यक्ष कॉ अमित सातळेकर, कॉ अशोक गाडे, कॉ अशोक पिंपळकर, कॉ प्रशांत घाटोळ,कॉ कमलेश घासे, कॉ किशोर मालगे, कॉ गणेश उज्जैनकर, कॉ संजय माकोडे सहित संघटना सभासद उपस्थित होते, द्वारसभेचे संचालन व आभार प्रदर्शन कॉ अमित सातळेकर यांनी केले