अकोला(जिमाका)- शहरी व ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शेतकऱ्यांनी सार्वजनिकरित्या पोळा साजरा न करता घरीच बैलाचे पूजन करुन पोळा हा सण साजरा करावा, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहे.
मंगळवार (दि.18) रोजी पोळा (पिठोरी) हा सण शहरी व ग्रामीण भागामध्ये शेतकरी वर्गाकडून मोठया प्रमाणावर साजरा करण्यात येते. अशाप्रकरणी लोक एकत्र येवून सण साजरा करीत असतात. कोविड-19 च्या विषाणूचा पादुर्भाव व फैलाव होवून रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी प्रतीबांधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे.
पोळा हा सण प्रत्येकानी आपआपल्या घरीच बैलाचे पूजन करुन व पूजाअर्चना करुन साजरा करावा. पोळा सण साजरा करण्यासाठी सामूहिकपणे एकत्र येता येणार नाही, ज्या- क्षेत्रामध्ये पांरपारिक पध्दतीने पोळा सण साजरा करण्यासाठी नागरिक एकत्र येत असतात अशाठिकाणी कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात येत आहे, बैलांना सजवून त्यांची मिरवणुक काढता येणार नाही. वाद्य, ढोल, तासे अथवा ध्वनीक्षेपकाचा कोणताही साधनाचा वापर करण्यास प्रतिबंध आहे, बैलाची शर्यत, बक्षीस स्पर्धा व घरोघरी बैलाना घेवून जाणे इत्यादीवर पूर्णता निंर्बंध राहिल, सदर आदेशाची अंमलबजावणी शहरी भागाकरीता मनपा आयुक्त्ा तसेच नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी संबंधीत मुख्याधिकारी व ग्रामीण भागाकरीता संबंधीत तहसिलदार यांनी करावे, असे जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशा प्रमाणे अपर दंडाधिकारी संजय खडसे यांनी आदेश दिले आहे.