अकोला -आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 238 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 213 अहवाल निगेटीव्ह तर 25 अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 3201(2691+510) झाली आहे. आज दिवसभरात 81 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 23554 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 22915, फेरतपासणीचे 169 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 470 नमुने होते. आजपर्यंत एकूण 23479 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 20788 आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 3201(2691+510) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज 25 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 25 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी 19 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात पाच महिला व 14 पुरुष आहेत. त्यातील वाडेगाव येथील पाच जण, केळकर हॉस्पीटल व बाशीटाकळी येथील प्रत्येकी तीन जण, अकोट येथील दोन जण तर उर्वरित शिवसेना वसाहत, चंडीकापूर ता. अकोट, कौलखेड, मुर्तिजापूर, खदान व पाळोदी ता.अकोला येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात तीन महिला व तीन पुरुष आहेत. त्यातील पातुर येथील तीन जण तर उर्वरित वाडेगाव, बालाजी नगर व खांबोरा न्यु येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, काल रात्री प्राप्त झालेल्या रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे.
81 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३० जणांना, कोविड केअर सेंटर येथून 26 जण, उपजिल्हा रुग्णालय, मुर्तिजापूर येथून 12 जण, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन जण, हॉटेल रेजेन्सी येथून एक, कोविड केअर सेंटर अकोट येथून 10 जणांना अशा एकूण 81 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.
471 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 3201(2691+510) आहे. त्यातील 131 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 2599 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 471 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.