• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, May 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

प्लास्टीक बंदी; कारवाईकडे पाठ, जनजागृतीसाठी निधी खर्च

Team by Team
August 8, 2020
in अकोला, Featured, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
79 1
0
प्लास्टीक बंदी
12
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : राज्य शासनाने प्लास्टीक तसेच थर्माकॉल बंदीचा निर्णय घेतल्यानंतरही राज्यात सर्वत्र खुलेआमपणे प्लास्टीक पिशव्या व त्यापासून तयार होणाºया वस्तूंचा वापर सुरु आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचे विघटन होत नसल्याची जाणीव असताना सुध्दा प्लास्टीक पिशव्यांचे धडाक्यात उत्पादन व विक्री केली जात आहे. संबंधित व्यावसायीकांच्या कारखान्यांवर धाडी घालून त्यांच्या मुसक्या आवळण्याचे सोडून पर्यावरण विभागाने प्लास्टीक व थर्माकॉलच्या मुद्यावर जनजागृती करण्याचा सोयीस्कर पर्याय निवडला असून प्रदूषण नियंत्रण मंडळासाठी १० कोटी रुपयांच्या अनुदानाची तरतूद करण्यात केली आहे.

प्लास्टीक व थर्माकॉलपासून तयार होणाºया विविध प्रकारच्या वस्तू व त्यांच्या वापरामुळे पर्यावरणाची प्रचंड हानी होत आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक पिशव्यांचे विघटन होत नसल्याने विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. शहरांमधील सर्व्हीस लाईन, सार्वजनिक जागा, नाल्या, गटारे आदी ठिकाणी प्लास्टीक पिशव्यांचा खच साचल्याचे दिसून येते. नाले-गटारांमधील घाण पाणी वाहून जाण्यासाठी प्लास्टीक पिशव्या आडकाठी ठरत आहेत. उघड्यावर साचलेल्या प्लास्टीक पिशव्यांमधील खाद्यपदार्थ खाल्ल्याने मोकाट जनावरांना मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. एकूणच प्लास्टीक व थर्माकॉलच्या वापरामुळे पर्यावरणाची हानी होत असून कचºयाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. ही बाब ध्यानात घेता शासनाने जून २०१८ मध्ये प्लास्टीक पासून तयार होणाºया विविध वस्तूंसह पिशव्यांच्या वापरावर बंदी आणन्याचा निर्णय घेतला होता. तसेच उत्पादने करणाºया कारखान्यांवर कारवाई करण्याचे अधिकार प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण विभाग, जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्तांना देण्यात आले होते.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

कारवाईला खो; दुकानदारी जोरात
शासनाने प्लास्टीक पिशव्यांचे उत्पादन, विक्री व वापर करणाºया व्यावसायीकांवर पहिल्यांदा पाच हजार रुपये दंडाची तरतूद केली आहे. दुसºयांदा १० हजार रुपये आणि तीसºयांदा वापर करताना आढळल्यास २५ हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांचा कारावास अशी तरतूद केली. महापालिका वगळता प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण विभाग, जिल्हा प्रशासनाने कारवाईला ‘खो’दिला असून पडद्याआडून दुकानदारी सुरु असल्याची माहिती आहे.

Tags: कारवाईप्रदूषणप्लास्टीक
Previous Post

ओबीसी आरक्षणाची पायमल्ली सुरू असल्याच्या विरोधात पातुर तहसीलदारांना वंचित चे निवेदन

Next Post

अकोला-खंडवा मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून नको – राज्य वन्य जीव मंडळ

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
अकोला-खंडवा मार्ग

अकोला-खंडवा मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून नको - राज्य वन्य जीव मंडळ

आर्थिक मदत

कोरोना वॉर्डात दिव्यांगांसाठी विशेष सुविधा!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.