कोरोना अलर्ट
आज सोमवार दि. 3 ऑगस्ट २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल- ५०
पॉझिटीव्ह- १९
निगेटीव्ह- ३१
अतिरिक्त माहिती
आज सकाळी १९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात सात महिला व १२ पुरुष आहेत. त्यात बाबुळगाव अकोला येथील तीन जण, रेणुका नगर व बाळापूर येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित कापसी, उमरी, सिव्हिल लाईन, घोडेगाव तेल्हारा, सहकार नगर, सुवर्णा नगर, पी एस मुख्यालय, मूर्तिजापूर, लोहारा बाळापूर, डाबकी रोड, खदान व जवाहर नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान दोघांचे मृत्यू झाले. त्यात ७० वर्षीय पुरुष असून ते दाळंबी अकोला येथील रहिवासी आहे. त्यांना दि. दोन ऑगस्ट रोजी दाखल झाले होते. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला तसेच ५१ वर्षीय पुरुष असून ते लोहारा, बाळापूर येथील रहिवासी आहे. त्यांना दि. एक ऑगस्ट रोजी दाखल झाले होते. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला
दरम्यान काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. यांची कृपया नोंद घ्यावी.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २३३२+३६६=२६९८
मयत-११२, डिस्चार्ज- २१४६
दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-४४०
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
घरीच रहा, सुरक्षित रहा!