अकोला- पोलीस अधीक्षक अकोला यांचे विशेष पथकाची ग्राम आखतवाडा येथे सुरू असलेल्या जुगारावर छापा ०८ आरोपी विरूध्द गुन्हा नोंद एकुण १,८६,०६०/-रूपयांचा मुद्देमाल हस्तगत. दिनांक ०२/८/२०२० रोजी पोलीस अधीक्षक अकोला यांचे विशेष पथक हे अकोलाशहरात अवैद्यधंद्यावर रेड करणे कामी पेट्रोलींग करीत असता त्यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली कि ग्राम आखतवाडा या ठिकाणी श्रीकृष्ण दुर्गे यांचे शेतात काही ईसम ५२ तास पत्यावर तीन पानी परेल नावाचा पैश्याचे हारजीतचा खेळ खेळीत आहे.
अश्या मिळालेल्या माहीती वरूण ग्राम आखतवाडा या ठिकाणी श्रीकृष्ण दुर्गे यांचे शेतात सुरू असलेल्या जुगारावर छापा टाकला असता त्या ठिकाणी नामे १)प्रविण सुरेश ढगे वय ३५ वर्ष रा.शामाबाद आखतवाडा २)पंढरीनाथ नारायण खेडकर वय ६२ वर्ष रा.लोहोगाव पो.स्टे नांदगाव खंडेश्वर जि.अमरावती ३)गजानन तुळशीराम दुर्गे वय ४५ वर्ष रा.व्दारका नगर बेलसरे मार्केट मागे मोठी उमरी अकोला ४)श्रावण रामदास चिपडे वय ३८ वर्ष रा.आखतवाडा ५)कैलास पांडुरंग गाडे वय ४५ वर्ष रा.अनकवाडी ६)समाधान रामराव शिरकरे वय ४३ वर्ष रा.धोती ७)नामदेव भाउराव चिपळे वय ६१ वर्ष रा.आखतवाडा ८) प्रमोद देवराव वानखडे वय ४८ वर्ष रा.धोती असे जुगार खेळ खेळतांना मिळुण आले त्यांचे पासुन एकुण नगदी ३०,०६०/-रू ,विविध कंपण्याचे एकुण ०६ मोबाईल कि अं ६,०००/-रू तसेच मोटर सायकल १)होरो होन्डा एच एफ डिलक्स क्र MH-27-AU-3147 कि अं ५०,000/-रू २)हिरो पॅशना प्रो क्र MH-30-AU-4415 कि अं४०,000/-रू ३) हिरो ग्लॅमर क्र MH-30-AS-7687 कि i ६०,000/-रू आणि ५२ तास पत्ते असा एकुण १,८६,०६०/-रूपयांचा मुद्देमाल मिळुण आला वरुण आरोपीतांविरुध्द पोलीस स्टेशन बोरगाव मंजू येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नमूद कारवाई मा श्री जी.श्रीधर पोलीस अधीक्षक अकोला व मा श्री. प्रशांत वाघुड़े अपर. पोलीस अधिक्षक अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली श्री मिलिंदकूमार अ.बहाकर पोलीस निरिक्षक विशेष पथक अकोला व त्यांच्या पथकाने केली आहे.