तेल्हारा (प्रतिनिधी)- तेल्हारा नगर परिषद अंतर्गत सुरू असलेल्या हिंदू स्मशानभूमी व मुस्लिम कब्रस्थान मधील विकास कामांनमध्ये मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळे सदर कामांची सखोल चौकशी करण्यात यावी या करीता नागरिकांनी तहसीलदार तेल्हारा यांच्या मार्फत २७ जुलै ला जिल्हाधिकारी अकोला यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली आहे निवेदनातून सदर कामात भ्रष्टाचार झाल्याचा हमखास दावा सुध्दा करण्यात आला व तपासणी करिता येणारा खर्च देण्यास तयार असल्याचे सुध्दा नमूद करण्यात आले आहे.
तेल्हारा नगर परिषदेच्या माध्यमातून ७२,४०,४४६/- रुपयांचे हिंदू स्मशानभूमी आवार भिंत व विकास कामे तसेच ७२,७१,६११/- रुपयांचे मुस्लीम कब्रस्थान आवार भिंतीचे व विकास कामे चालु असतांना कामांमध्ये संबंधित ठेकेदाराकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याबाबत मुख्याधिकारी व नगर परिषद, तेल्हारा अध्यक्षा यांना लेखी तक्रार करून तसेच तोंडी सांगून कळविले होते. होत असलेला भ्रष्टाचार थांबवण्याची विनंती केली होती, परंतु तरी सुद्धा त्यांनी सदर कामात भ्रष्टाचार केलाच.
सदर दोन्ही कामांमध्ये आवार भिंती करिता जे खड्डे खोदावे लागतात ते अंदाज पत्रकाप्रमाणे खोदल्या गेले नाहीत. वस्तुस्थिती, अंदाजपत्रक व एम बी रेकॉर्ड मधील घेतलेले मापे यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. अंदाजपत्रका प्रमाणे खड्ड्यांची लांबी-रुंदी, तसेच इतर कामे झाले नसल्याचे आम्ही खात्रीपूर्वक सांगतो. तसेच हिंदू स्मशानभूमीत जे पेवर्स ब्लॉक बसविण्यात आले त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तफावत आहे. पेवर ब्लॉकच्या खाली ज्या प्रमाणात मुरूम टाकावयास पाहिजे त्या प्रमाणात टाकण्यात आला नाही. कोठे कोठे तर मुरुमच टाकण्यात आला नाही. पेवर ब्लॉकचे काम सुद्धा अंदाज पत्रकाप्रमाणे झाले नाही. त्यामुळे याकामामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झाला आहे.
सदर सर्व काम निकृष्ट दर्जाचे झालेले असून या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे हे आम्ही हमखासपणे सांगतो. तरी आपण सदर कामांची आपल्या स्तरावरून विनाविलंब चौकशी करून भ्रष्टाचार करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करावी व भ्रष्टाचार करणाऱ्यांना आपण पाठीशी घालणार नाही हि अपेक्षा. सदर कामांच्या तपासणी करिता जो काही खर्च येईल तो आम्ही करण्यास तयार आहोत असे निवेदनातून नमूद करण्यात आले आहे . सदर कामांची विनाविलंब चौकशी करून कारवाई न केल्यास उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल.असा इशारा सुध्दा देण्यात आला निवेदनाच्या प्रती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना . अशोक चव्हाण , पालकमंत्री ना. बच्चूभाऊ कडू , आ.
गोपीकिशन बाजोरिया , आ.डॉ. रणजित पाटील , आ. अमोल मिटकरी यांच्याकडे पाठविण्यात आल्यात निवेदनावर तेल्हारा येथील नागरिक प्रशांत वाळके , शुभम ठाकूर , ज्ञानेश्वर सुरे , अमोल इंगोले , सुनिल मिरगे यांच्या यांच्या स्वाक्षऱ्या आहेत तेल्हारा पालिकेतील विकास कामांवर करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.