मूर्तीजापुर (सुमित सोनोने):- येथील जुनी वस्ती परदेशीपुरा पोळा चौकातील विश्व विख्यात असलेल्या पुरातन काळापासून जागृत देवस्थान म्हणून प्रचलित सोपीनाथ मंदिर शनिवारी दि.२५ जुलैनागपंचमीच्या दिवशी बंद राहणार असल्याची माहिती मंदिराचे पुजारी शितलप्रसाद भगत यांनी दिली आहे.
सध्या संपूर्ण देशात कोरोणा महामारीमुळे अनेकांचे बळी गेले आहेत. आणि अनेकजण या महामारीमुळे त्रस्त झाले आहे. कोरोणा महामारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व सोशल डिस्टींग ठेवण्यासाठी मंदीर ट्रस्टच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. नागपंचमी निमित्त होणारे संपूर्ण पाच दिवशीय धार्मिक कार्यक्रम भजन,किर्तन आदी सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.नागपंचमीच्या पाच दिवसापूर्वी पासून सोपीनाथ मंदिर परदेशीपुरा जुनी वस्ती पोळा चौक येथे दररोज रात्री उशिरापर्यंत भजन,किर्तन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात येते.मात्र यावर्षी होणारे संपूर्ण कार्यक्रम कोरोणा महामारीमुळे रद्द करण्यात आले आहे. दि.२५ शनिवार रोजी मंदिरात सकाळी फक्त पूजाअर्चा होवुन संपूर्ण दिवस सोपीनाथ मंदिर देवदर्शनासाठी बंद राहणार आहे. शहरातील संपूर्ण सोपीनाथ बाबा भक्कतांनी आपल्या घरीच सोपीनाथ महाराजांची पुजाअर्चा करावी.भक्ततांना होणाऱ्या त्रास्ताबददल मंदिर प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. अशी माहिती मंदीराचे पुजारी शितलप्रसाद भगत,माजी नगराध्यक्ष कृष्णकुमार जमादार, नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांनी दिली आहे.