अकोला,दि.23-आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 224 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 201 अहवाल निगेटीव्ह तर 23 अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 2301(2094+207) झाली आहे. आज दिवसभरात 58 रुग्ण बरे झाले. आता 339 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 17366 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 16854, फेरतपासणीचे 162 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 350 नमुने होते. आजपर्यंत एकूण 17249 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 15155 आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 2301(2094+207) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज 23 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 23 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात पाच महिला व 18 पुरुष आहेत. त्यातील नऊ जण सेंट्रल जेल येथील, तीन जण पळसोबढे येथील, दोन जण सिंदखेड येथील, बोरगांव मंजू, हैदरपुरा खदान, मुर्तिजापूर, रामनगर, पातूर, सरस्वती नगर, नित्यानंद नगर, जीएमसी व सेवरा अकोला येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तर आज सायंकाळी प्राप्त 48 अहवालांत एकही पॉझिटीव्ह रुग्ण आढळला नाही, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून देण्यात आली आहे.
58 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तेल्हारा येथील दोन व बुलडाणा येथील एक अशा तिन जणांना घरी पाठविण्यात आले. कोविड केअर सेंटर अकोला येथून खामगांव येथील 11, अकोट येथील सहा, बोरगाव मंजू येथील पाच, बाळापूर येथील चार व बुलडाणा, सिंधी कॅम्प, उमरी आणि कच्ची खोली येथील प्रत्येकी एक अशा एकूण 30 जणांना घरी पाठविण्यात आले. तर कोविड रुग्णालय मुर्तिजापूर येथून 12 जणांना, आयकॉन हॉस्पिटल येथून एक जण तर हॉटेल रेजेन्सी येथून 12 जणांना अशा एकूण 58 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.
दोघांचा मृत्यू
दरम्यान आज दोन जणांचा मृत्यू झाला. त्यात 52 वर्षीय महिला असून ती आमीनपुरा अकोट येथील रहिवासी आहे. त्या दि. 20 जुलै रोजी दाखल झाल्या होत्या. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला. तसेच 50 वर्षीय महिला असून त्या बोरगांव मंजू येथील रहिवासी आहे. त्या दि. 7 जुलै रोजी दाखल झाल्या होत्या. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.
339 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूणपॉझिटीव्ह अहवालांची संख्या 2301(2094+207) आहे. त्यातील 106 जण (एक आत्महत्या व 105 कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 1856 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 339 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.