तेल्हारा (प्रतिनिधी)- तेल्हारा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून तालुक्यातील गावांमध्ये रुग्ण आढळत आहे अशातच आज खबरदारी म्हणून रॅपिट टेस्ट केल्या असता त्यामध्ये दोन जणांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आले.
शहरात आज प्रशासनाकडून ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथे शहरातील व्यावसायिक व इतर नागरिकांसाठी अँटीजन रॅपिट टेस्ट करून घेण्याचे आवाहन करण्यात आले होते यामध्ये आज ४६ नागरिकांनी आपली टेस्ट करून घेतली त्यामध्ये ४४ जण हे निगेटिव्ह आले असून दोन जण पॉझिटिव्ह निघाले आहेत.यामध्ये नाथ नगर मधील एकाच कुटुंबातील ३१ वर्षीय वडील व ८ वर्षीय त्याची मुलगी रॅपिट टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह निघाल्याची माहिती ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ अशोक तापडिया यांनी अवर अकोला न्यूज शी बोलतांना दिली.प्रशासनाकडून सदर भाग सील करण्याची प्रक्रिया राबवण्याची मोहीम सुरू असून पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासन योग्य ती खबरदारीच्या उपाययोजनाच्या कामाला लागले आहे.तसेच शहरातील जनतेने घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करीत योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.