• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 14, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सायबर गुन्ह्यांच्या दोनशेपेक्षा अधिक तक्रारी

जानेवारी ते ३० जून या कालावधीत अकोला सायबर सेलकडे २६८ तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत.

Team by Team
July 22, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, गुन्हा, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
78 0
0
सायबर गुन्ह्या
11
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : मोबाइल, लॅपटॉप तसेच संगणकाच्या युगात सायबर गुन्हेगारीही प्रचंड वाढली असून, आॅनलाइन फसवणूक, बदनामी, तसेच महापुरुषांविषयी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी जानेवारी ते ३० जून या कालावधीत अकोला सायबर सेलकडे २६८ तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. यामधील बहुतांश तक्रारदारांचे समाधान झाल्याने केवळ १४ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून, यापैकी ८ गुन्हे उघडकीस आणत सहा आरोपींना जेरबंद करण्यात अकोला सायबर सेलला यश आले आहे.

अकोला सायबर सेलकडे आलेल्या तक्रारींमध्ये अधिक तक्रारी या ओटीपीची मागणी करून बँक खात्यातून पैसे काढणे, आॅनलाइन आमिष देऊन फसवणूक करणे, एटीएम क्लोन करून परस्पर पैसे काढणे, फेसबुक तसेच मेसेंजरच्या माध्यमातून अडचणीत असल्याचे सांगत तसेच मित्राच्याच खात्यावरून पैशाची मागणी केल्याचे गुन्हे अकोला सायबर सेलने दाखल केले आहेत. यासोबतच आॅनलाइन माध्यमातून वाहन खरेदी आणि विक्रीच्या व्यवहारातही मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचे तक्रारीवरून समोर आले आहे.
तर गिफ्ट लागल्याचे आमिष देऊन आणि लोन देण्याच्या आमिषाखालीही अनेकांना लाखो रुपयांनी गंडविल्याचे वास्तव आहे. या भुरट्या चोरांनी आतापर्यंत १५ लाखांपेक्षा अधिक रुपयांनी आॅनलाइन गंडा घातल्याचे वास्तव असून, यामधील केवळ ४ लाख रुपयांची रक्कम गोठवून ती परत करण्यासाठी पूर्ण प्रक्रियेची कामगिरी सायबर सेलने केली आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

कोरोनामुळे तपास रखडले
नेट बँकिंग तसेच आॅनलाइन गिफ्ट आणि एटीएमएच्या नावाखाली ओटीपी मागून पैसे गायब करणाऱ्या हॅकरचा शोध लावण्यात सायबर सेलला यश आले आहे; मात्र हे हॅकर्स नोएडा, दिल्ली, राजस्थान आणि पश्चिम बंगाल राज्यातील असल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचणे कोरोनामुळे शक्य नसल्याने या कालावधील काही प्रकरणांचे तपास रखडल्याची माहिती आहे. सायबर सेलसोबतच स्थानिक गुन्हे शाखेने आयटी अ‍ॅक्ट तसेच सायबर गुन्ह्यांतील आरोपींना तातडीने अटक करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

फेसबुक-व्हॉट्स अ‍ॅपवर युवतींचा छळ
फेसबुक तसेच व्हॉट्स अ‍ॅप हे सोशल मीडियाची माध्यमे महिला तसेच युवतींसाठी डोकेदुखी ठरत आहेत. मेसेंजरवर मेसेज करणे, त्यानंतर विविध आमिषे देऊन त्यांचा मोबाइल क्रमांक घेणे आणि युवतींचा छळ करण्याचे प्रकार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्यासाठी सायबर सेलकडून वारंवार आवाहन करून आॅनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याच्या सूचना करण्यात येत आहेत; मात्र तरीही बहुतांश युवती व महिला आमिषाला बळी पडत असल्याची माहिती समोर आली आहे.

Tags: ऑनलाइननेट बँकिंगसायबर गुन्ह्याहॅकर
Previous Post

आम्ही प्लाझ्मा दिला; तुम्ही पण द्या!

Next Post

दिव्यांग कल्याण निधी खर्चाचा आढावा: निधी खर्च न करणाऱ्यांवर कारवाई

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
bacchu kadu

दिव्यांग कल्याण निधी खर्चाचा आढावा: निधी खर्च न करणाऱ्यांवर कारवाई

akola-corona-update-3-april-2020

257 अहवाल प्राप्त; 40 पॉझिटीव्ह, 19 डिस्चार्ज

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.