कोरोना अलर्ट
आज मंगळवार दि.२१ जुलै २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल-११४
पॉझिटीव्ह- १२
निगेटीव्ह- १०२
अतिरिक्त माहिती
आज सकाळी १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात पाच महिला व सात पुरुष आहेत. त्यातील तीन जण हे बारगणपुरा अकोट येथील, तीन जण बोरगाव मंजू येथील, दोन जण रामनगर, तर उर्वरीत अकोली जहागीर अकोट, जीएमसी, खैर मोहम्मद प्लॉट व जिल्हा कारागृह येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट मध्ये ३२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्या व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २०३१+१५३=२१८४
मयत-१०४(१०३+१), डिस्चार्ज- १७५४
दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३२६
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
घरीच रहा, सुरक्षित रहा!