तेल्हारा (प्रतिनिधी)- तेल्हारा तालुक्यात कोरोनाच्या एन्ट्रीने तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आज सकाळी आलेल्या अहवालात तेल्हारा शहरातील एक तर हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात कोरोनाचा रुग्ण आढळला आहे.
जिल्हयातील इतर तालुक्याच्या तुलनेत तेल्हारा तालुका हा कोरोनाच्या पादुर्भावा पासून दूर राहला होता.मात्र आज कोरोनाने पुन्हा एन्ट्री केली असून शहरातील एका ५५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण लागल्याचे निष्पन्न झाले असून तालुक्यातील हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बादखेड( सौन्दळा)येथील युवकाला सुद्धा कोरोनाची लागण लागल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.पॉझिटिव्ह रुग्ण निघाल्याने एरिया सील करण्यात आला असून प्रशासन योग्य ती खबरदारी घेऊन उपाय योजना राबवित आहे.नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन तालुका प्रशासन यांच्या कडून करणयात आले आहे.