अकोट (शिवा मगर)- अकोट तालुक्या मधील NIMA,HIMPA व IMA या डॉक्टर्स संघटनानि दुर्धर रुग्णाची तपासनी दिनांक 18 ,19, 20जुलै ,3 दिवस रुग्णाची तपासणी मोफत करणार आहे. या संघटनाणी रुग्णाच्या स्वास्था साठी त्यांच्या आरोग्या साठी त्यांची मोफत तपासणी करणार आहेत. या मध्ये दुर्धररुग्ण म्हणजे दमा, मधुमेह,कॅन्सर,उच्च रक्त दाब,अशा रुग्णाची तपासणी होईल. या रुग्ण तपासणी चा वेळ सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत पर्यंत आहे. ह्या सर्व रुग्णांची तपासणी डॉक्टर आपल्या स्वतःच्या क्लिनिक,हॉस्पिटलमध्ये मध्ये करणार आहे.सदर या मोफत तपासणीच्या मोहिमे साठी उपविभागीय अधिकारी साहेब अकोट यांना डॉ धर्मपाल चिंचोळकर, डॉ संदीप ढोक,डॉ मोहिब वफा ,डॉ गजानन महल्ले यांनी माहिती देऊन निवेदन दिले आहे.
तसेच या तपासणी मोहिमेमध्ये खालील डॉक्टर्स आपापल्या दवाखान्यांमध्ये मोफत तपासणी करणार आहेत ,तरी रुग्णांनी अवश्य लाभ घ्यावा .डॉ धर्मपाल चिंचोळकर(जिजामाता चौक अकोट),डॉ संदीप ढोक(बस स्टँड रोड)डॉ जपसरे सर( जुने लक्झरी स्टँड च्या मांगे) डॉ गजानन महल्ले (गजानन नगर),डॉ मुहिब वफा (राजस्थान चौक),डॉ श्याम बोंद्रे(हिवरखेड रोड)डॉ अमोल भगत(कबुतरी मैदान)डॉ अनुप थुटे(नंदी पेठ)डॉ अमोल हागे(यात्रा चौक)डॉ अमर चांभाटे(लक्झरी स्टँड)डॉ पी वि लढाऊ(उमरा)डॉ बानोरकर सर (जिजामाता नगर)डॉ अजय पांडेे(अकोला अर्बन बँक जवळ)डॉ सतिष म्हैसनेे(तळोकार पुरा)डॉ मंगेश टोलमारे(येवदा),डॉ माधुरी इचे ,डॉ संगीता साबळे(जिजामाता नगर),डॉ मानकर(रूईखेड)डॉ सचिन गणगणे(अकोली)डॉ संजय महल्ले(बोर्डी) डॉ जयस्वाल(बोर्डी)डॉ सुभाष गणगणे(मुंडगाव) डॉ म्हैसने (मुंडगाव)डॉ भिरडे(मुंडगाव) डॉ राम जयस्वाल(राजस्थान चौक)डॉ सौ सेदानी(गजानन नगर)डॉ गोपाल पवार (वडाळी दे) डॉ मंगेश अंबळकार(वडाळी दे )डॉ कैलाश धुळे ,अकोट हे सर्व डॉक्टर तपासणी करणार आहे.