अकोला – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज १६ जुलै रोजी जाहीर करण्यात आला यामध्ये अकोला जिल्ह्याचा निकाल ९०.८० टक्के लागला आहे. यामध्ये मुलीच अव्वल ठरल्या आहेत. जिल्ह्यात यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी २५ हजार ५२९ नियमित विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. त्यापैकी २५ हजार ४६८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी २३ हजार १०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ९०.८० अशी आहे. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८७.८८ टक्के, तर मुलींची टक्केवारी ९४.१५ टके अशी आहे. जिल्ह्यात सर्वाधिक निकाल पातूर तालुक्याचा ९३.०८ टक्के लागला आहे. त्याखालोखाल अकोला तालुका ९२.८५ टक्के, बार्शीटाकळी तालुका ९१.१३ टक्के, मुर्तीजापूर तालुका ९०.३८ टक्के, अकोट तालुका ८८.९१ टक्के, बाळापूर तालुका ८६.९८ टक्के व तेल्हारा तालुका ८४.९१ टक्के असा क्रम आहे.विज्ञान शाखेचा निकाल ९७. ७१ टक्केजिल्ह्याचा एकूण निकाल ९०.८० टक्के लागला असून, यामध्ये विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक म्हणून ९७.७१ टक्के लागला आहे. त्या खालोखाल वाणिज्य शाखेचा निकाल ९५ टक्के, कला शाखा ८२.६६ टक्के, तर व्यावसायिक शाखेचा निकाल ८२.११ टक्के लागला आहे.