• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 5, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

315 अहवाल प्राप्त; 33 पॉझिटीव्ह, 37 डिस्चार्ज, एक मयत

Media Desk by Media Desk
July 15, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, कोविड १९
Reading Time: 1 min read
78 1
0
akola corona updates
12
SHARES
566
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.15-आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 315 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 282 अहवाल निगेटीव्ह तर 33 अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 1943(1922+21) झाली आहे. आज दिवसभरात 37 रुग्ण बरे झाले. तर एकाचा उपचार घेतांना मृत्यू झाला. आता 215 जणांवर उपचार सुरु आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 15233 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 14761, फेरतपासणीचे 158 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 314 नमुने होते. आजपर्यंत एकूण 15156 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 13234 आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 1943(1922+21)आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
आज 33 पॉझिटिव्ह

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

आज दिवसभरात 33 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज सकाळी प्राप्त अहवालात 26 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात 11 पुरुष व 15 महिला आहेत. त्यात अकोट येथील सात जण, अकोली जहागीर येथील पाच जण, गौरक्षण रोड येथील तिन जण, बाळापूर, मुर्तिजापूर व रजपूतपुरा येथील प्रत्येकी दोन, चांदुर, बोरगाव मंजू, मोठी उमरी, धोत्रासिंदे आणि मुंडगाव येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तर आज सायंकाळी प्राप्त अहवालात सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात पाच महिला व दोन पुरुष आहेत. यात रजपूतपुरा, पातूर आणि पारस येथील प्रत्येकी दोन, अकोट येथील एक प्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
37 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दिवसभरात कोविड केअर सेंटर मधून 32, आयकॉन हॉस्पिटल येथून दोन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ओझोन हॉस्पिटल, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथून प्रत्येकी एक, अशा 37 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. शासकीय महाविद्यालयातून आज अकोट येथील महिलेला घरी पाठविण्यात आले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील कोविड सेंटर मधून 32 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. यात पातुर येथील 11, गिता नगर व सिंधी कॅम्प येथील सहा, निमवाडी येथील चार, डाबकी रोड येथील तिन, बोरगाव मंजू व शेळी मालेगाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, अशी माहिती कोविड केअर सेंटर येथून देण्यात आली.
एकाचा मृत्यू

दरम्यान एका जणाचा मृत्यू झाला. हा रुग्ण मुंडगाव ता.अकोट येथील 76 वर्षीय पुरुष असून तो दि. 13 जुलै रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

215 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण 1943(1922+21) पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील 98 जण (एक आत्महत्या व 97 कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या 1630 आहे. तर सद्यस्थितीत 215 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

Previous Post

अकोला शहर व जिल्ह्यात १७ , १८,१९ जुलै पर्यंत संपूर्ण लॉक डाउन

Next Post

तालुकास्तरावर रॅपिड टेस्टव्दारे संशयित कोविड रुग्णाची तपासणी करावी वेब व्हिसीव्दारे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
जिल्हाधिकारी

तालुकास्तरावर रॅपिड टेस्टव्दारे संशयित कोविड रुग्णाची तपासणी करावी वेब व्हिसीव्दारे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

Jitendra Papalkar

जिल्हयात पोलिस अधिनियम 1951 चे 37(1)(3) कलम लागू

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.