तेल्हारा (प्रतिनिधी)- तेल्हारा येथे कोरोनाचा शिरकाव झाल्याची बातमी माहिती पडताच तालुका प्रशासन अलर्ट झाले असून कामाला लागले आहे.तर संपूर्ण ग्रामीण रुग्णालय सॅनेटाईज करण्यात आले आहे.
तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपूर्वी कोरोनाने शिरकाव केला होता त्यानंतर गाडेगाव व माळेगाव येथे रुग्ण आढळले होते त्यामधील एका माळेगाव येथील महिलेचा अकोल्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता तर गाडेगाव येथील रुग्ण बरे होऊन घरी परतले.आज सकाळच्या अहवालात तेल्हारा येथील एक जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले असून सदर रुग्ण ही महिला असून ती ग्रामीण रुग्णालय येथील कोरोना योद्धा आहे म्हणजेच तेथील परिचारिका असल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. सदर परिचरिकेला आधीच विलगीकरन करण्यात आले होते कारण या आधी ग्रामीण रुग्णालय येथील परिचारिका पॉझिटिव्ह निघाली होती त्यांच्या संपर्कात आल्याने त्यांचा अहवाल आज प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले आहे.तेल्हारा येथे कोरोना पॉझिटिव्ह आढल्याची बातमी पसरल्यांनातर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र सदर रुग्ण हा विलगीकरना मध्ये असल्याने कोणीही घाबरून जाऊ नये तसेच प्रशासनास सहकार्य करीत काळजी घेण्याचे आवाहन तहसीलदार सुरडकर यांनी केले आहे.