• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 11, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजनेत वाशीम जिल्हाधिका-यांनी लाभार्थीला वाटलेल्या जमिनीवर साडे सहा लाखाचा बोझा!,

वंचित कडून बोझा नील करून गुन्हे दाखल करण्याची मागणी - राजेंद्र पातोडे

Media Desk by Media Desk
July 11, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
rajendra patode
12
SHARES
569
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि. ११ – वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील राजुरा येथील अढाव बंधू कडून समाज कल्याण विभागाने ४. ४५ हे.आर. जमीन विकत घेतली होती. सदर जमीन सेवा सहकारी सोसायटी राजुरा कडे गहाण आहे.ह्याची शहानिशा न करता ही जमीन दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजनेत अनुसूचित जातीच्या तीन लाभार्थ्यांना प्रत्येकी १. ४५ हे. आर. वाटप करण्याचा आदेश तत्कालीन जिल्हाधिका-यांनी २०१८ साली पारित केला.सात बारा वर देखील महाराष्ट्र शासन व लाभार्थीची नोंद झाली आहे.परंतु ह्या जमिनीवर साडेसहा लाखाचा बोझा असल्याने लाभार्थीना कुठलीही बँक कर्ज देत नाही.शिवाय समाज कल्याण अधिकारी कार्यालयाशी संपर्क केला असता चोंडकर नावाचे अधिकारी बोझा असलेली जमीन तुम्ही कशी घेतली असा, प्रश्न विचारत असल्याने लाभार्थी हवालदिल झाले आहेत.समाज कल्याण विभागाने केलेल्या फसवणुकी विरोधात वंचित बहुजन आघाडीने मुख्यमंत्री, सामाजिक न्याय विभागाकडे तक्रार दाखल केली आहे सदर शेत जमिनीवरील बोझा नील करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे.
दादासाहेब गायकवाड सबळीकरण वन स्वाभिमान योजनेतून दारिद्यरेषे खालील अनुसूचित जाती, नवबौद्ध भूमिहीन शेतमजुर कुटुंबाला कायम स्वरूपी उत्पनाचे साधन म्हणून ४ एकर कोरडवाहू किंवा २ एकर बागायती जमीन वाटप केली जाते. ५० टक्के अनुदान व ५० टक्के कर्ज अश्या रीतीने जमीनीचे वाटप असते. २०१८ साली वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील राजुरा येथील धन्यकुमार अढाव, माणिकराव अढाव व किशोरकुमार अढाव बंधूची सामायिक ४. ४५ हे.आर. जमीन समाज कल्याण विभागाने विकत घेतली होती.राजुरा शेतशिवारातील शेतीचा सर्व्हे क्र. ८८ आहे.खरेदी करताना सदर जमीन सेवा सहकारी सोसायटी राजुरा कडे गहाण होती.त्यावर दोन लाख दहा हजार कर्ज काढून शेतजमीन सोसायटी कडे घाण ठेवण्यात आली होती.ही माहिती अढाव ह्यांनी खरेदी देताना लपवून ठेवली होती.समाज कल्याण विभागाच्या अधिका-यांनी देखील कुठलीही शहानिशा न करता सदर जमीन दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजनेत अनुसूचित जातीच्या तीन लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी खरेदी केली.खरेदी केलेल्या जमिनीची किंमत प्रत्येक लाभार्थ्यासाठी नऊ लाख बारा हजार दोनशे पन्नास अशी आकारण्यात आली.त्यानुसार चार लाख छप्पन हजार एकशे पंचवीस रुपये कर्ज आणि तेवढ्याच रकमेचे अनुदान सदर लाभार्थीना मंजूर करण्यात आले.संतोष महादेव रणबावळे, आशा भगवान खरात व पार्वती कैलास खंडारे ह्या तीन लाभार्थीना प्रत्येकी १. ४५ हे. आर. जमीनीचे वाटप तत्कालीन जिल्हाधिका-यांनी ६/४/ २०१८ साली केले.त्याच आदेशानुसार तहसीलदार मालेगांव ह्यांनी सात बारा वर देखील महाराष्ट्र शासन व लाभार्थीची नोंद घ्यावी असे नमूद आहे.त्यानुसार मा. राज्यपाल ह्यांचे वतीने अनंत मुसळे विशेष अधिकारी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग वाशीम आणि तिन्ही लाभार्थीची भोगवटदार म्हणून सातबारा वर नोंद केली. तसा फेरफार आणि ताबा पावती करून देण्यात आली.

गेली दोन वर्षे तिन्ही लाभार्थी त्यांना दिलेल्या शेतीची वहिती करीत आहेत.आपल्याला मिळालेल्या शेतीवर कर्ज काढण्यासाठी त्यांनी जेव्हा सेवा सहकारी सोसायटी आणि बँकांशी संपर्क साधला तेव्हा त्यांना सदर जमिनीवर साडेसहा लाखाचा बोझा असल्याची धक्कादायक बाब माहिती झाली.ह्या जमीनीवर बोझा असल्याने लाभार्थीना कुठलीही बँक कर्ज देत नाही.शिवाय समाज कल्याण अधिकारी कार्यालयाशी संपर्क केला असता चोंडकर नावाचे अधिकारी बोझा असलेली जमीन तुम्ही कशी घेतली असा,प्रतिप्रश्न लाभार्थीना विचारला.आम्ही अढाव ह्यांचा सहा लाखाचा धनादेश रोखला आहे परंतु सदर धनादेश कार्यालयात सापडत नसल्याचे बेजबाबदार उत्तर लाभार्थीना देण्यात आले आहे.गहाण असलेली शेतीची खरेदी समाज कल्याण विभागाने केली आहे.जिल्हाधिकारी ह्यांचे निवड समितीने ही जमीन लाभार्थ्यांना वाटप केली आहे.खरेदी व्यवहारात शासकिय व महसूल यंत्रणा असताना अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांची व शासनाची फसवणूक करणारा जमीन खरेदीचा व्यवहार करण्यात आला आहे.हे प्रकरण गंभीर असल्याने वंचित बहुजन आघाडी ने मुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री, अमरावती विभागीय सामाजिक न्याय विभागाचे सहआयुक्त विजय साळवे ह्यांचे कडे तक्रार दाखल केली आहे.तिन्ही लाभार्थी शेतक-याचे शेतीवरील साडेसहा लाखाचा बोझा तात्काळ नील करण्यात यावा तसेच ह्या खरेदी गैरव्यवहारात सहभागी असलेल्या शेत मालक आणि समाज कल्याण विभागाच्या अधिकारी कर्मचारी व तत्कालीन जिल्हाधिकारी ह्यांचे सोबत निवड समिती वर गुन्हे दाखल करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

ट्विटर, पिंट्रेस्टला मागे टाकत देशी स्टार्टअप ‘ट्रेल’ने घेतली आघाडी

Next Post

मुकेश अंबानी आता जगातील सातवे श्रीमंत व्यक्ती

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
मुकेश अंबानी

मुकेश अंबानी आता जगातील सातवे श्रीमंत व्यक्ती

मुर्तीजापुर

मुर्तीजापुर न.प.मध्ये माजी नगराध्यक्षांच्या फलकावर नाव कायम ठेवान्याची मागणी,ना.बच्चु कडू यांना निवेदन

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.