• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 30, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अवैध धंद्यांनी त्रस्त महिलांची हिवरखेड पोलीस स्टेशनला धडक, कार्यवाही न झाल्यास पोलीस स्टेशन ला करणार ठिय्या आंदोलन

Media Desk by Media Desk
July 11, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
84 1
0
हिवरखेड पोलीस स्टेशन
13
SHARES
607
VIEWS
FBWhatsappTelegram

हिवरखेड (प्रतिनिधी)- हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांना आश्रय भेटत असल्याने अवैध धंदे प्रचंड प्रमाणात बोकाळले आहेत. ज्यामध्ये विना परवाना दारू विक्री, गावरान दारू विक्री, गौवंश कत्तल व गौवंश मांस विक्री, तस्करी, वरली, मटका, जुगार, गौण खनिज रेती तस्करी, इत्यादी अनेक प्रकारचे अवैध धंदे तेजीत असून त्यांना हिवरखेड पोलिसांचे अर्थपूर्ण अभयदान असल्याची चर्चा आहे.

हिवरखेड येथून जवळच असलेल्या हिंगणी येथील महिलांनी अवैध धंद्यांना कंटाळून थेट हिवरखेड पोलिस स्टेशनला धडक देत अवैध दारू विक्री तात्काळ बंद करून कार्यवाही बाबत निवेदन सादर केले. एवढेच नव्हे तर हिंगणी ग्रामपंचायत मार्फत काही दिवसांपूर्वी सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्याबाबत हिवरखेड पोलीस स्टेशनला निवेदन सादर करण्यात आले होते. परंतु तरीही अवैध धंदे बंद झाले नाहीत.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

अकोला जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या हिवरखेड ग्रामपंचायत मार्फत लोकांनी ग्रामसभेत हिवरखेड मधील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्याबाबत ठराव पास केला होता. परंतु सर्वोच्च असलेल्या ग्रामसभेच्या ठरावाला केराची टोपली दाखविण्यात आल्याचे चित्र आहे. अडगाव येथील नागरिकांनी सुद्धा अवैध धंदे बंद करण्यासाठी निवेदन दिलेले आहे. आदिवासी बहुल ग्राम पिंपरखेड येथील महिलासुद्धा पोलीस स्टेशनवर धडकल्या होत्या.

एकंदरीत हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक गावांमध्ये “अग्निपथ” च्या “मांडवा” सदृश्य परिस्थिती आहे. पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने अनेक वेळा टाकलेल्या छाप्यांमधून गोवंश तस्करी, अवैध दारू, जुगार, इत्यादी अनेक प्रकारच्या कारवाया वारंवार केल्याने हिवरखेड पोलीस करतात तरी काय?? असा प्रश्न निर्माण होत आहे.

हिंगणी येथील महिलांनी दिलेल्या निवेदनात अनेक गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. अवैध दारू विक्री मुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असून अवैध धंदे बंद करणाऱ्यांना हटकल्यास आम्ही पोलिसांना पैसे देतो तुम्ही आमचे काय करनार? असे उद्धट उत्तर अवैध धंदेवाईक देत असल्याचे निवेदनात नमूद आहे.  त्यामुळे 24 तासात कारवाई करून अवैध धंदे बंद न झाल्यास पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करणार असल्याचे महिलांनी सांगितले आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षकांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन आवश्यक ती पावले उचलण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे

नवीन पोलीस अधीक्षकांकडून महिलांना अपेक्षा
अनेक वर्षांपासून आर्थिक हितसंबंधांपोटी सुरू असलेले अवैध धंदे पाहता नवीन एस. पी. जी श्रीधर साहेब आले असल्याने त्यांनी आता हिवरखेड येथे दबंग ठाणेदाराची नियुक्ती करून कायदा व सुव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा महिलावर्ग व्यक्त करीत आहेत.

Tags: हिवरखेड पोलीस स्टेशन
Previous Post

कोविड-१९ च्या उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिविर, टॉसिलिझुमॅब या औषधांचा काळाबाजार रोखणार

Next Post

आज पुन्हा दहा कोरोनाबाधितांची भर,ॲक्टीव्ह रुग्ण ३१८ तर एकूण आकडा १८५९ पार

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
akola-corona-update-3-april-2020

आज पुन्हा दहा कोरोनाबाधितांची भर,ॲक्टीव्ह रुग्ण ३१८ तर एकूण आकडा १८५९ पार

राजनाथ सिंह

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी कोरिया गणराज्याच्या संरक्षणमंत्र्यांशी दूरध्वनीवरुन संवाद साधला

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.