• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 5, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

राष्ट्रीयत्व, धर्मनिरपेक्षता व नागरिकत्व या विषयांवरील धडे अभ्यासक्रमातून वगळण्याचा सीबीएसईचा निर्णय उघड राष्ट्रद्रोह – राजेंद्र पातोडे

Media Desk by Media Desk
July 10, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
77 1
0
rajendra patode
55
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोला दि. ९ – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने नववी ते बारावीपर्यंतच्या वर्गासाठी २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाचा अभ्यासक्रम ३० टक्क्यांपर्यंत कमी करताना अभ्यासाच्या गाभ्याला धक्का लावला जाणार नाही, असेही सांगीतले होते, प्रत्यक्षात हा निर्णय घेताना मात्र सीबीएसईने राष्ट्रीयत्व, धर्मनिरपेक्षता व नागरिकत्व या विषयांवरील धडे अभ्यासक्रमातून वगळून भारतीय लोकशाहीच्या मूळ गाभ्याला नख लावले आहे हा उघड उघड राष्ट्रद्रोह असल्याची संतप्त प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे ह्यांनी दिली आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाने यंदा अभ्यासक्रमात ३० टक्के पर्यंत कपात केली आहे. ही कपात करताना जे विद्यार्थी पुढील वर्षी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा देणार आहेत, त्यांना धर्मनिरपेक्षता, नागरिकत्व, राष्ट्रीयता, डिमॉनेटायझेशन आणि लोकशाही हक्क या विषयांसह इतर अनेक विषय यंदाच्या वर्षाकरिता अभ्यासक्रमातून वगळले आहेत.या विषयांवरील प्रश्न अंतर्गत मूल्यमापन किंवा वार्षिक परीक्षेला येणार नाहीत.अद्ययावत अभ्यासक्रमानुसार दहावी इयत्तेसाठी लोकशाही आणि वैविध्यता, लिंगभेद, धर्म आणि जात, प्रसिद्ध चळवळी आणि लोकशाहीसमोरील आव्हाने या विषयांशी संबंधित पाठ वगळ्ण्यात आले आहेत.अकरावीसाठी संघराज्यवाद, नागरिकत्व, राष्ट्रीयत्व, धर्मनिरपेक्षता आणि भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थाचा विकास हे विषय अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात आले आहेत. इंग्रजी विषयात लेटर टू एडिटर, जॉब अॅप्लिकेशन लेटर सारखे विषय वगळण्यात येणार आहेत.बारावीसाठी विद्यार्थ्यांना भारताचे परराष्ट्र संबंध हा विषय यंदापुरता वगळण्यात आला आहे.पाकिस्तान, म्यानमार, बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळ या देशांशी भारताचे संबंध, भारताच्या आर्थिक विकासाचे बदलते स्वरुप, भारतातील सामाजिक चळवळी आणि डिमॉनिटायझेशन हे विषय वगळले आहेत.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने विवेकबुद्धीने हा अभ्यासक्रम कमी केला आहे, मात्र त्याच्या गाभ्याला हात लावलेला नाही.तथापि हा निर्णय विवेकबुद्धीने नव्हे तर मनुवादी वृत्तीने घेण्यात आला असून हा संविधान विरोधी निर्णय आहे.देशाला पूर्वोत्तर राष्ट्र व नेपाळ चीन पाकिस्तान सह अनेक राष्ट्र उघड आवाहन देत आहेत.अश्यात विध्यार्थ्यांना राष्ट्र म्हणून संवैधानिक मूल्य आणि लोकशाहीला पूरक शिक्षण आवश्यक आहे.राष्ट्र प्रथम असा नारा देणा-या भाजप संघाचा कुटील अजेंडा राबविण्यासाठी हा निर्णय करण्यात आला आहे.लोकशाही आणि वैविध्यता, लिंगभेद, धर्म आणि जात, प्रसिद्ध चळवळी आणि लोकशाहीसमोरील आव्हाने,धर्मनिरपेक्षता,नागरिकत्व,राष्ट्रीयता,डिमॉनेटायझेशन आणि लोकशाही हक्क हे विषय सत्ताधा-याचे मनसुबे उधळून लावणारा आहे.त्या साठी जाणीवपूर्वक अशी कपात करण्यात आली आहे.हा निर्णय राष्ट्रद्रोहाचा असून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ,केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे संबंधित अधिका-यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

Tags: राजेंद्र पातोडे
Previous Post

लाखपुरी सह लाखपुरी सर्कल मध्ये शेतीच्या नुकसानीचा सर्वे करण्याचा मुहुर्त निघेणा

Next Post

मास्क, सॅनिटायझरच्या साठेबाजी काळा बाजाराला केंद्र सरकारकडून प्रोत्साहन – वंचित बहुजन आघाडी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
वंचित बहुजन आघाडी

मास्क, सॅनिटायझरच्या साठेबाजी काळा बाजाराला केंद्र सरकारकडून प्रोत्साहन - वंचित बहुजन आघाडी

आत्महत्या

वाढदिवसाच्या दिवशी १२ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.