• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

सोयाबिनवरील चक्रभुंगा या किडीचे व्यवस्थापन

Media Desk by Media Desk
July 9, 2020
in अकोला, Featured, अकोला जिल्हा, अकोला शहर, शेती
Reading Time: 1 min read
90 1
0
सोयाबिन किडी
24
SHARES
652
VIEWS
FBWhatsappTelegram

ओळख व नुकसानीचा प्रकार-    सोयाबिन  वरील चक्रभुग्याचा प्रौढ  भुंगेरा फिक्कट तपकिरी रंगाच्या ७ ते १० मिमी  लांब    असतो  व मादी नरापेक्षा मोठी  असते. सोयाबीन  पीकवाढीच्या सुरूवातीच्या काळात मादी  भुंगेरा सोयाबीन पिकाचा देठ, फांदी  किंवा मुख्य खोडावर अंडी घालविण्यासाठी दोन समांतर खापा करून त्यामध्ये अंडी घालतो. त्यामुळे जमिनीतील अन्नपुरवठा बंद होतो आणि खापाचा वरचा भाग वाळुन जातो. या  चक्री कापात चंक्री भुंग्याचा मादी भुंगेरा आठ  ते ७२ अंडी  घालतो.  अंडी अवस्था चार ते आठ दिवस असते. अंड्यातून    बाहेर पडलेली  अळी  दंडगोलाकृती, पिवळसर पाढरी,  गुळगुळीत असुन तिचा डोक्यावरील भाग जाड असतो व तिच्या धडाच्या खालील भागावर उभरट ग्रंथी असतात.  पुर्ण वाढ झालेली अळी १९ ते २२ मि.मी लांब असते. अंड्यातून बाहेर पडलेली अळी  सोयाबिनचे देठ,  फांद्या व खोड  पोखरून पोकळ  पोकळ करते व अळी  अवस्था ३२ ते ६२ दिवसाची असते.  या किडीचा  प्रादुर्भाव पिक दिड ते दोन  महिन्याचे अवस्थेत झाल्यास किडग्रस्त  झाड इतर झाडासारखेच दिसत असल्यामुळे प्रादुर्भाव लक्षात येत नाही. नंतरच्या काळात खापेवरील फांदी वाळलेली दिसते व आतुन खोड पोखरल्या गेल्यामुळे पिकाचे मोठ्या  प्रमाणात नुकसान होवुन उत्पादनात लक्षणीय घट येते.

             एकात्मीक व्यवस्थापन योजना-    सोयाबिनची  पेरणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत संपवावी, सोयाबिनची  पेरणी करतांना   अती  दाट किंवा  अती विरळ पेरणी टाळावी व  सोयाबीनच्या  पेरणीकरीता बियाण्याचा दर पेरणीचे अंतर शिफारशीप्रमाणेच ठेवावे,  चक्रभुंग्याच्या प्रादुर्भावामुळे आढळणारी किडग्रस्त पाने,  वाळलेल्या फांद्या यांचा आतील किडीसह नायनाट करावा,  सोयाबीन पिकाच्या सुरूवातीच्या अवस्थेत पाच टक्के   निंबोळी अर्काची फवारणी  करावी,   सोयाबिन पिकात चक्रभुंगा या किडीने आर्थिक  नुकसानीची  पातळी ओलांडली असेल म्हणजे  सोयाबिन पिकात तीन ते पाच चक्रभुंगा प्रति मिटर ओळीत आढळल्यास किंवा सरासरी दहा टक्के किंवा त्यापेक्षा जास्त चक्रभुंगाग्रस्त झाडे आढळुन आल्यास खालीलपैकी कोणत्याही एका किटकनाशकाची गरजेनुसार योग्य निदान करून निर्देशित प्रमाणात  फवारणी करावी.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

            प्रोफेनोफॉस ५०  टक्के ई. सी.२० मिली अधिक दहा  लिटर पाणी किंवा थायक्लोप्रीड  २१.७ टक्के  एस.सी. १५ मिली अधिक दहा लिटर पाणी  किंवा क्लोरॅन्टीनीप्रोल १८.५ एस.सी. दोन मिली अधिक दहा लिटर पाणी किंवा इथिऑन ५० टक्के इ.सी. १५ ते ३० मिली अधिक १० लिटर पाणी किंवा ट्रायझोफॉस ४० टक्के  ई.सी. १२.५ मिली अधिक  दहा लिटर पाणी  किंवा थायमिथोझॉम १२.६ टक्के + लॅम्बडा सायहेलाथ्रीन ९.५ टक्के  (संयुक्त किटकनाशक) २.५ मिली अधिक दहा लिटर पाणी.

            वर निर्देशित प्रमाणात घेवुन कोणत्याही एका किटकनाशकाची इतर एकात्मिक किड व्यवस्थापनाच्या घटकाचा  वापर करून  गरजेनुसार व योग्य निदान  करून फवारणी  करावी.

            रासायनिक किटकनाशके वापरण्यापुर्वी लेबलक्लेम शिफारशीची शहनिशा करून लेबलक्लेम शिफारशीप्रमाणे आर्थिक  नुकसानीची पातळी लक्षात घेवुन योग्य शिफारसीत प्रमाणात योग्य वेळीच फवारणी करावी, अनेक रसायने एकत्र करून फवारणी टाळावी, मुदतबाह्य झालेली किटकनाशके व एक्सपायरी झालेली किटकनाशके यांची  फवारणी  टाळावी,  प्रत्यक्ष तज्ज्ञांचा सल्ला घेवुन कीडीचे योग्य निदान करून व आर्थिक  नुकसानीची पातळी लक्षात घेवुन लेबलक्लेम  शिफारशीप्रमाणे किटकनाशकांचा वार करणे केव्हाही हितावह व योग्य  असते, निर्देशित किटकनाशके फवारतांना लेबल क्लेम शिफारशीप्रमाणे फवारणीसाठी निर्देशित पाण्याची मात्र प्रतिहेक्टर वापरावी, असे राजेश डवरे किटकशास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, करडा, वाशीम यांनी कळविले आहे.

Previous Post

अकोला जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा

Next Post

प्रायोगिक तत्वावर दहावी, बारावीचे वर्ग पाच ऑगस्टपासून सुरू – राज्यमंत्री बच्चू कडू

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
राज्यमंत्री बच्चू कडू

प्रायोगिक तत्वावर दहावी, बारावीचे वर्ग पाच ऑगस्टपासून सुरू - राज्यमंत्री बच्चू कडू

आधार कार्ड UIDAI

UIDAI कडून दिलासा, कागदपत्रांशिवाय मिळवा आधार कार्ड

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.