तेल्हारा (प्रतिनिधी)- गेल्या महिनाभरापूर्वी तेल्हारा तालुक्यात कोरोनाने शिरकाव केला होता आज पुन्हा कोरोनाने गाडेगाव येथील एक पुरुषाला तर माळेगाव येथील महिलेला कोरोनाची लागण लागली आहे.यामध्ये सदर महिला ही कालच मरण पावली असल्याने आता तिच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध घेणे सुरू आहे.
तालुक्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण निघाल्याने प्रशासन हादरले असून गाडेगाव माळेगाव बा येथे पोलीस तहसील पंचायत समिती आरोग्य विभाग प्रशासन दाखल होऊन नागरिकांची तपासणी सुरू आहे.यामध्ये रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्यात येत आहे.तर दोन्ही गावे सील करण्यात आली आहेत.
अहवालामध्ये तेल्हारा येथील दोन रुग्ण दाखवल्याने शहरात भीतीचे वातावरण
आज प्राप्त अहवालामध्ये तेल्हारा येथील दोन रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले मात्र सदर रुग्ण हे तेल्हारा तालुक्यातील गाडेगाव व माळेगाव येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे मात्र तेल्हारा नाव आल्याने शहरात मात्र भीती निर्माण होऊन गोंधळाचे वातावरण पहावयास मिळाले.