• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 14, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

संदिग्ध व जोखमीच्या व्यक्तिंचा प्रत्येक गावनिहाय आढावा घ्या- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश

Media Desk by Media Desk
June 30, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
11
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.३०- कोरोना प्रादुर्भावाचे प्रमाण जिल्ह्यात वाढत असतांना आता त्याचा ग्रामिण भागातही शिरकाव झाल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत संदिग्ध वाटणारे रुग्ण, अन्य व्याधींनी ग्रस्त असणारे ज्येष्ठ नागरिक असे जोखमीच्या व्यक्तिंचा प्रत्येक गावनिहाय आढावा घ्या,  दैनंदिन तपासणी व  चाचण्यांवर भर द्या, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी  सर्व यंत्रणांना दिले.

 जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणासाठी ग्रामिण भाग तसेच जिल्ह्यातील अन्य नगरपालिका क्षेत्रात राबवावयाच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी  जिल्हा नियोजन सभागृहात आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस पोलीस अधिक्षक जी. श्रीधर,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसिलदार, तालुका वैद्यकीय अधिकारी, गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

यावेळी जिल्ह्याच्या शहरी व ग्रामिण  भागनिहाय कोरोना संसर्ग फैलाव , उपचार सुविधा  व उपाययोजना या संदर्भात सादरीकरण करण्यात आले.  यावेळी निर्देश देण्यात आले की, मनपा हद्दीत तसेच ग्रामिण भागात वा जिल्ह्यातील अन्य शहरी भागात  प्रतिबंधित क्षेत्रातून कोणालाही ये-जा करण्यास मनाई आहे, याबाबत काटेकोर अंमलबजावणी व्हावी. प्रत्येक ठिकाणी एका पॉझिटीव्ह रुग्णामागे किमान २० वा आवश्यकता भासल्यास अधिक संपर्क तपासले गेले पाहिजे व त्यांच्या चाचण्या झाल्या पाहिजे.  ग्रामिण भागात प्रत्येक आरोग्य केंद्रात रुग्ण वाहिकेची उपलब्धता आरोग्य यंत्रणांनी सुनिश्चित करावी. तालुका पातळीवर काम करणारे तहसिलदार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी  व गटविकास अधिकारी यांनी परस्पर समन्वयाने काम करावे.  प्रत्येक गावात ज्येष्ठ नागरिक,  आधीपासूनच व्याधीग्रस्त असणारे (मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब, दमा इ.) व्यक्ती, गरोदर माता या सगळ्यांची आरोग्य तपासणी झाली पाहिजे.  जोखमीच्या व्यक्तींची ऑक्सिजन पातळी  दररोज तपासली जावी.  आपापल्या तालुक्यातील पॉझिटीव्ह रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला तर संबंधित रुग्ण व त्याचे नातेवाईक यांच्याशीही तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी दूरध्वनीवरुन संपर्कात रहावे. त्यांना कशाची गरज असल्यास तसे जिल्हास्तरीय कक्षास कळवावे, जेणे करुन रुग्णाला अधिक चांगली सेवा देता येईल.

चाचण्या वाढविण्यासाठी स्वॅब संकलन केंद्रांची संख्या वाढविण्यात यावी. बार्शी टाकळी, तेल्हारा, बाळापूर, अकोट व पातूर येथे हे केंद्र सुरु करण्यात यावे, अशी सुचनाही जिल्हाधिकारी पापळकर यांनी केली.  संपर्क शोध वाढविणे, चाचण्यांची संख़्या वाढविणे व  ग्रामस्तरीय समित्यांमार्फत प्रत्येक गावातील प्रत्येक व्यक्तिनिहाय  जोखमीच्या व संदिग्ध लोकांचा आढावा घेण्यात यावा,असे निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी यंत्रणेला दिला.

‘हॅप्पी हायपॉक्झिया’ या अवस्थेपासून बचाव करा

कोविडच्या अनुषंगाने वारंवार शरिरातील ऑक्सिजन पातळी तपासणे आवश्यक आहे. ज्याला SpO2 पातळी असे म्हणतात.  ही पातळी ९५ ते १०० पर्यंत सामान्य समजली जाते. ९५ ते ९० पर्यंत ही पातळी असल्यास तो व्यक्ती जोखमीचा ठरतो. त्यावर सातत्याने लक्ष देणे व निरीक्षण ठेवणे आवश्यक असते. आणि ही पातळी ९० पेक्षा कमी झाल्यास त्या व्यक्तीस  तातडीने  रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असते. साधारणतः दम लागणे, धाप लागणे हे ऑक्सिजन पातळी कमी झाल्याचे प्राथमिक लक्षण असते. मात्र धोका तेव्हा असतो जेव्हा रुग्णाला याबाबत जाणीवच होत नाही. या अवस्थेला ‘हॅप्पी हायपॉक्झिया’ असे म्हणतात.  विशेष म्हणजे कोविड बाधितांमध्ये ही अवस्था जास्त आढळू शकते. त्यामुळे असे रुग्ण ओळखण्यासाठी  त्या व्यक्तीला पाच ते सहा मिनीटे चालायला सांगावे, असे मार्गदर्शन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी बैठकीत उपस्थित यंत्रणांना केले.

Previous Post

भारत वृक्ष क्रांती मोहिम; कडु लिंब बीजारोपण उपक्रम यशस्वी करा- जिल्हाधिकारी पापळकर

Next Post

२६२ अहवाल प्राप्तः १४ पॉझिटीव्ह, ५२ डिस्चार्ज, दोन मयत

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
akola corona updates

२६२ अहवाल प्राप्तः १४ पॉझिटीव्ह, ५२ डिस्चार्ज, दोन मयत

vitthala

बा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातलं विठ्ठलाच्या चरणी साकडं

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.