• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 14, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

भारत वृक्ष क्रांती मोहिम; कडु लिंब बीजारोपण उपक्रम यशस्वी करा- जिल्हाधिकारी पापळकर

Media Desk by Media Desk
June 30, 2020
in अकोला, Featured, अकोला जिल्हा, अकोला शहर
Reading Time: 1 min read
79 1
0
कोरोनाच्या मुकाबल्यासाठी जिल्ह्यात सहा कोटींचा निधी उपलब्ध
11
SHARES
572
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.३०-  भारत वृक्ष क्रांती मिशन या संस्थेमार्फत ए. एस. नाथन (समाजसेवक) संस्थापक यांच्या मार्फत  जिल्ह्यात वृक्ष लागवडीच्या संकल्पाचा भाग म्हणून  या वर्षी प्रत्येक नागरिकाने आपापल्या गावात, शेतात, घराजवळ कडु लिंबाच्या बिजाचे रोपण करा,असे  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अधिनस्त यंत्रणांना कळविले आहे.

भारत वृक्ष क्रांती मिशन अंतर्गत  सन २०१५ पासून अकोला जिल्ह्यात एक विद्यार्थी एक वृक्ष, एक जन्म एक वृक्ष ही वृक्षारोपणाची मोहिम राबविली. या मोहिमेला ‘अकोला पॅटर्न’ म्हणुन प्रसिद्धी मिळाली आहे. आता वृक्ष रोपणाचा एक भाग  म्हणून संपुर्ण अकोला जिल्ह्यातील प्रत्येक गावात निंबाच्या झाडाचे बिजांचे रोपण करण्याचा मिशनचा प्रयत्न आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

            या उपक्रमाअंतर्गत अकोला जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी निंबाच्या झाडाच्या बिया गोळा करुन आपआपल्या शेताच्या बांधावर ७ ते १०  फुट अंतरावर दोन इंचाचे खड्डे करुन त्यात दोन बिया रोपण कराव्यात. तसेच आपआपल्या घराजवळील परिसरात असलेल्या मोकळ्या मैदानाच्या आजुबाजुला, रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी व इतर ठिकाणी दोन इंचाचे खड्डे करुन त्यात दोन बिया रोपण कराव्यात. गावातील नागरिक, विद्यार्थी, युवा संघटना व सामाजिक संघटना यांनी ई-क्लास जमीन, खुली जमीन, वनजमीन, डोंगराळ जमीन, रस्त्याचे आजुबाजुला व इतर पडीक जमीनीमध्ये दोन इंचाचे खड्डे करुन त्यात दोन बिया रोपण कराव्यात. प्रत्येक ग्रामपंचायत तसेच शहरातील नगरपालिका यांचेमार्फत बियांचे रोपण करण्यात यावे.

            निंबाच्या झाडांच्या बिया ह्या एक महिन्यामध्ये रोपण न केल्यास त्यांचा कालावधी संपून त्यापासुन झाडांची निर्मिती होणार नाही. या गोष्टीची खबरदारी घेऊन ग्रामपंचायत/नगरपालिका यांनी त्यांचे क्षेत्रातील नागरिकांना याबाबत अवगत करावे. हा उपक्रम राबवितांना सर्व नागरिकांनी त्यांना कोरोना संसर्ग होऊ नये, याकरिता सामाजिक अंतर पाळावे तसेच या कार्यालयाकडून यापूर्वी व वेळोवेळी निर्गमित केलेले सर्व आदेशांचे पालन करावे. उपरोक्त मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन निंबाच्या झाडाच्या बियांचे रोपण केल्यास अकोला जिल्ह्यास खालीलप्रमाणे फायदे होतील.

            अकोला वासियांना उन्हाळ्यात जास्त तापमानांचा सामना करावा लागतो. जर जिल्ह्यात निंबाच्या झाडांचे मोठ्या प्रमाणात रोपण झाल्यास त्यामुळे वातावरण थंड होऊन उन्हाळ्यामध्ये तापमान कमी होण्यास मदत होते. या झाडांची पान माकडे/वानरे खात असल्यामुळे माकडांकडुन शेतीतील पिकांचे नुकसान कमी होण्यास मदत होईल.  हे  झाड शेताच्या बांधावर लावल्यास त्यांचे पाने शेतात पडुन नैसर्गिक खताची निर्मीती होते. निंबाचे झाड हे औषधी वनस्पती आहे. तसेच झाडामुळे ऑक्सीजनची मात्रा वाढते तसेच प्रदुषण कमी करते.या झाडांमुळे जमीनीतील पाणी पातळी वाढण्यास मदत होते. या बीज रोपणामार्फत जी झाडे उगवतील त्यांना पाणी देण्याची आवश्यकता नाही. तसेच हे झाड उन्हाळयात हिरवेगार राहते. या झाडांचे लिंबोळी आणि पानांपासून फवारणीकरीता लिंबोळी अर्क बनविता येतो, असे अनेक फायदे या झाडाचे असल्याने या लागवड अभियानात नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करावे,अशी सुचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अधिनस्त यंत्रणांना केली आहे.

Previous Post

लोकजागर मंचचे अध्यक्ष अनिल गावंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व बियाणे वाटप

Next Post

संदिग्ध व जोखमीच्या व्यक्तिंचा प्रत्येक गावनिहाय आढावा घ्या- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

संदिग्ध व जोखमीच्या व्यक्तिंचा प्रत्येक गावनिहाय आढावा घ्या- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश

akola corona updates

२६२ अहवाल प्राप्तः १४ पॉझिटीव्ह, ५२ डिस्चार्ज, दोन मयत

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.