• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 14, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home कोविड १९

११० अहवाल प्राप्तः एक पॉझिटीव्ह, एक मयत, ६१ डिस्चार्ज

Team by Team
June 23, 2020
in कोविड १९, Corona Featured, Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
corona
15
SHARES
564
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि. २३- आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे ११० अहवाल प्राप्त झाले. त्यातील १०९ अहवाल निगेटीव्ह तर एक अहवाल पॉझिटीव्ह आला. दरम्यान आज पहाटे उपचार घेतांना एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला. तर आज दिवसभरात ६१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या १२४४ झाली आहे.आजअखेर ३५१ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार आजपर्यंत एकूण ८९३२ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ८५९६, फेरतपासणीचे १३६ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २०० नमुने होते. आजपर्यंत एकूण ८८७२ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ७६२८ आहे.तर पॉझिटीव्ह अहवाल १२४४ आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

आज एकच पॉझिटिव्ह

आज दिवसभरात केवळ एकच अहवाल पॉझिटीव्ह आला. आज सकाळच्या अहवालात एका महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आला. ही दगडी पूल येथील रहिवासी आहे. तर सायंकाळी एकही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

एका महिलेचा मृत्यू

दरम्यान आज (दि.२३) पहाटे बाळापूर येथील रहिवासी असलेल्या पन्नास वर्षीय महिला रुग्णाचा उपचार घेतांना मृत्यू झाला. ही महिला दि.१२ जून रोजी दाखल झाली होती. तिचा आज पहाटे तीन वाजता मृत्यू झाला.

६१ जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १३ जणांना व डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठात स्थापण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर येथून काल (दि.२२) व आज (दि.२३) मिळून ६१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांत १० पुरुष व तीन महिला आहेत. त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यातील लक्ष्मी नगर व तारफैल येथील प्रत्येकी तीन, दोघे विजय नगर येथील तर उर्वरित सिंधी कॅम्प, मलकापूर, डाबकीरोड, चांदुर, बाळापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
तर कोविड केअर सेंटर मधून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांत वाडेगाव येथील १३, अकोट फैल येथील आठ, शिवर येथील पाच, रंगारहट्टी बाळापूर येथील चार, तर गायत्रीनगर, गुलजारपुरा, चावरे प्लॉट, जठारपेठ, रजपूतपुरा येथील प्रत्येकी दोन तर शंकरनगर, फिरदौस कॉलनी , मोहता मिल, गितानगर, हरिहरपेठ, सिंधी कॅम्प, संत कबीर नगर, बापूनगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती कोवीड केअर सेंटर येथून देण्यात आली.

३५१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आता सद्यस्थितीत १२४४ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील ६७ जण (एक आत्महत्या व ६६ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या ८२६ आहे. तर सद्यस्थितीत ३५१ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

Tags: अकोलाकोरोनाकोविड १९
Previous Post

अमरावती येथे पन्नास लोकांच्या उपस्थितीत विवाह समारंभास मान्यता जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडून आदेश जारी

Next Post

पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचा जिल्हा दौरा (सुधारीत)

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
पालकमंत्री

पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचा जिल्हा दौरा (सुधारीत)

Papalkar_23rd June

प्रत्येक रुग्णावर उपचार करणे बंधनकारक- जिल्हाधिकारी पापळकर यांचे निर्देश

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.