मुर्तिजापूर (सुमित सोनोने)- देशात कोरोना संकटामुळे राज्यात अत्यंत भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे.
परंतु समाजात आपल्या कलेने मनोरंजनाचा आनंददायी वारसा निर्माण करणारे “कलाकार “हे मात्र अत्यंत हालाकीचे जीवन जगत आहे कोरोणाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊनमुळे अनेक लग्न ,रिसेप्शन, जयंती ,महोत्सवात होणारे संगीत कार्यक्रम रद्द झाले आहेत .आणि त्याचं संगीत कलाकार्यक्रम, ऑर्केस्ट्रावर ते स्वतःचे पोट भरून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असत परंतु लॉक डाऊनच्या मुळे संगीत कार्यक्रम बंद झाले अाणि अनेक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे त्याची ,त्यांच्या कुटुंबाची अत्यंत दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे .
परंतु ज्याप्रमाणे शासनाने अनेक व्यापारी ,दुकाने, मेडिकल, स्टोअर्स ,लग्न कार्य, सोहळा आणि इतर कार्यक्रमाला शासनाच्या अटी राखून परवानगी दिली आहे.
त्याचप्रमाणे कलाकारांना शासनाकडून आर्थिक मदत आणि फिजिकल डिस्टन्स ,सामाजिक अंतर ठेवून काही शासकीय अटी राखून संगीत कार्यक्रमाद्वारे आपली कला सादर करण्याची परवानगी द्यावी.ज्यामुळे ते स्वतःच्या कुटुंबाला आधार देऊ शकतील .त्याबाबत शासन आदेश काढावा.अश्या प्रकारचे निवेदन विदर्भ सांस्कृतिक कला प्रसारक मंडळ अकोला जिल्हाध्यक्ष श्री निलेश ढाकरे सर यांच्या नेतृत्वात विदर्भ सांस्कृतिक मूर्तिजापूर तालुका कार्यकारणी द्वारे तालुकाध्यक्ष श्री सागर इंगळे ,तालुका सचिव श्री निलेश मेहरे , उपाध्यक्ष अक्षय बुराने ,सल्लागार राहुल नाईक,प्रसिद्धी प्रमुख आकाश तिडके ,सहसचिव मयुरेश कुलकर्णी ,संपर्क प्रमुख आदित्य साबळे ,अक्षय टाक व इतर पदाधिकारी यांच्या उपस्थिती मध्ये अकोला जिल्हाधिकारी यांना उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर मार्फत निवेदन देण्यात आले.