अकोला,दि. २२- सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात येणाऱ्या राजर्षि शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार या योजनेच्या लाभाची रक्कम खाते क्रमांक किंवा खाते तपशिल चुकीचा असल्यामुळे खात्यात रक्कम जमा झालेली नाही.
अशा विद्यार्थ्यांचे खाते तपशिल दुरुस्त करुन संबंधित शाळा/महाविद्यालयामार्फत या कार्यालयास दि.२६ पर्यंत सादर करावेत. तपशिल दिलेल्या तारखेपर्यत प्राप्त न झाल्यास सर्व रक्कम शासन खाती जमा करण्यात येतील व त्यानंतर कोणाचेही म्हणणे ऐकून घेतले जाणार नाही, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, अकोला यांनी केले आहे.