• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 11, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home कोविड १९

323 अहवाल प्राप्तः 27 पॉझिटीव्ह, पाच मयत, 10 डिस्चार्ज

Team by Team
June 20, 2020
in कोविड १९, Corona Featured, Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
चाचणी
12
SHARES
566
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि. 20 – आज दिवसभरात(सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे 323 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 296 अहवाल निगेटीव्ह तर 27 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान आज सायंकाळी 10 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील 4 जणांना कोविड केअर सेंटर मध्ये निरीक्षणात ठेवण्यात आले आहे तर उर्वरित 6 जणांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच आज पाच जणांचा मृत्यू झाला. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 1163 झाली आहे. आजअखेर 347 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसारआजपर्यंत एकूण 8344 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 8022, फेरतपासणीचे 134 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 188 नमुने होते. आजपर्यंत एकूण 8341 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 7178 आहे.तर पॉझिटीव्ह अहवाल 1163 आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

आज 27 पॉझिटिव्ह

आज दिवसभरात 27 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. सकाळी प्राप्त अहवालात २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात नऊ महिला व सोळा पुरुष आहे. त्यात आदर्श कॉलनी येथील चार, शंकर नगर, अशोक नगर, न्यु साई नगर, जूने शहर येथील प्रत्येकी दोन, तर रामदास पेठ, अकोट फैल, बोरगांव मंजू, मूकूंद वाडी, हरिहर पेठ, हैदरपूरा, कच्ची खोली, खदान, शास्री नगर, गायत्री नगर, सोनटक्के प्लॉट, सिंधी कॅम्प व बुलडाणा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तर आज सायंकाळी दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन्ही पुरुष आहेत. त्यातील जवाहर नगर व जठारपेठ येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

पाच मयत

दरम्यान आज(दि. 20) रोजी उपचार घेताना 5 रुग्णाचा मृत्यू झाला. त्यापैकी शंकर नगर, अकोट फैल येथील 63 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला असून ते दि. 16 जून रोजी दाखल झाले होते, गुलजारपूरा येथील 62 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला असून ते दि. 16 जून रोजी दाखल झाले होते, पातूर येथील 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून ती दि. 15 जून रोजी दाखल झाले होती, मोठी उमरी येथील 55 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला असून ते दि. 8 जून रोजी शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात दाखल झाले होते त्याना ओझान हॉस्पीटल येथे दि. 14 जून रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांचा मृत्यू ओझान हॉस्पीटल येथे आज झाला आहे, अकबर प्लॉट, अकोट येथील 75 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला असून ते दि. 5 जून रोजी दाखल झाले होते.

10 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर 10 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात सहा जणांना घरी सोडण्यात आले तर चार जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. त्यात सात पुरुष आणि तिन महिला आहेत. त्यात अशोक नगर, त्रिमुर्ती नगर, सिंधी कॅम्प, तारफैल, अकोटफैल, शात्री नगर, मोठी उमरी, बाळापूर नाका, लहान उमरी, सोनटक्के प्लॉट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

347 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आता सद्यस्थितीत 1163 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील 64 जण (एक आत्महत्या व 63 कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या 752 आहे. तर सद्यस्थितीत 347 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

Tags: अकोलाकोरोनाकोविड १९
Previous Post

अबब…अकोल्यात एकाच दिवशी पाच रुग्णांचा मृत्यु, तर ॲक्टीव्ह रुग ३४७ वर

Next Post

तेल्हारा येथील शुभम बहाकर ठरला तहसीलदार पदाचा मानकरी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
तेल्हारा येथील शुभम बहाकर ठरला तहसीलदार पदाचा मानकरी

तेल्हारा येथील शुभम बहाकर ठरला तहसीलदार पदाचा मानकरी

rajesh-tope

राज्यात ५८ हजार ५४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.