अकोला (प्रतिनिधी)- अकोला जिल्हा भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटक कामगार संघटनेने कोरोना विषाणुच्या संकट काळात वाढत असलेल्या प्रचंड जीवघेण्या महागाई कमी करण्या बाबत निषेध दिनी एन.डी.मोदी सरकारला माहगाइ कमी करन्याचा इशारा देत निवेदन देशाचे महामहिम मा. राष्ट्रपती, देशाचे मा. पंतप्रधान, महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री यांना मा. जिल्हाधिकारी व जिल्ह्यातील मा. तहसीलदार यांच्या व्दारे पाठविण्यात आले निवेदनात म्हंटले आहे की, सन २०१४ व २०१९ वर्षी लोकसभा निवडणुका झाल्या २०१४ व २०१९ वर्षाच्या निवडणुक भाजपा सरकारच्या जाहिर नाम्यात माहागाई कमी करु, सर्वाना राशन पेंशन, काळा पैसा परत आणु, अंगणवाडी, कृषी विद्यापीठ, आशा, शालेय पोषण इत्या. कायम स्वरुपी नोकरी व २ करोड रोजगार, देण्या संबधी घोषेने चा वर्षाव करुन भाजपने सत्ता स्थापन केल्या नंतर ६ वर्षा कालावधीत सर्व सामान्य जनतेला या कोरोना विषाणुचा फटका बसल्याने नोकरी कामधंदा गमवावा लागला आहे आणि त्यात भर म्हणजे वाढत असलेल्या प्रचंड महागाई मुळे जीवन जगणे अत्यंत कठिण झाले आहे. आंतराष्ट्रीय पातळीवर पेट्रोल प्रति बॅरल दर अत्यंत कमी असल्यावर सुध्दा पेट्रोलचे दररोज ५० पैसे १ रुपयाने महागकरित आहात आपण देशातील नागरीकांना लुटत आहात का असा प्रश्न उपस्थीत झाला असल्याने संपुर्ण भारतात कॉ. डी राजा राष्ट्रिय महासचिव, महाराष्ट्रात कॉ. तुकाराम भस्में राज्य सचिव व अकोला जिल्ह्यात कॉ. रमेश गायकवाड यांच्या नेतृत्वात महागाई विरोधात आज आंदोलन होत आहे. चीनने भारतावर केलेल्या हल्याचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष निषेध करते आपण चीन धोरणावर आपले प्रखर मत धोरण स्पष्ट करावे चीन विरोधात आपण घेतलेल्या संविधानीक निर्णयाला भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जाहिर पाठिंबा आहे असे काल झालेल्या सर्व पक्षीय बैठकीत पक्षाचे महासचिव कॉ. डी. राजा यांनी आपणास पाठिबा दर्शविला आहे. करिता महागाई कमी करावी रोजगार वाढवावा व खालील मागण्यावर गांभीर्याने विचार करुन प्रलंबित प्रश्न सोडवावे.
मागण्या
१) भस्मासुरा सारखी वाढत चाललेली पेट्रोल, डिझलचे, गॅसचे भाव कमी करा.!
२) शेतक-यांच्या शेतीमालाला स्वामीनाथन समितीने शिफारस केल्याप्रमाणे भाव द्या.!
३) प्रत्येकाला किमान ७५००/- दरमहा द्या व स्थंलातरीत कामगारांना १०,०००/- रुपये भत्ता द्या.!
४) केंद्र सरकारने राज्य सरकारला विनाशर्त अर्थसहाय्य करावे.!
५) कामगारांचा पगार बंद होणार नाही किंवा पगार कपात होणार नाही याची हमी निर्माण करा.!
६) मनरेगाची मजुरी व दिवस वाढवा. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कामगारांचे प्रश्न सोडवा.!
७) युवकांना बेरोजगारांना बेरोजगारी भत्ता द्या व शहरी भागात रोजगार व निवा-यांची हमी द्या.!
८) किमान ३ महिण्याचे विज बिल, बँक कर्ज, मोबाईल मोबाईल बिल माफ करा.! या मागण्या घेवून कॉ. रमेश गायकवाड, कॉ. एस.एन. सानोने, कॉ. सुनिता पाटील, कॉ. नयन गायकवाड कॉ. सरोज मुर्तिजापुरक कॉ. अंतन सिरसाट, कॉ. दुर्गा देशमुख, कॉ. विद्याधर ढोरे, कॉ. राजेश वाघ, कॉ. स्वाति गायकवाड, कॉ. लता गावंडे, कॉ. शोभा खर्चे व शेकडो भाकप आयटक सदस्यानि घरी व तहसील समोर आंदोलात सहभागी झाले असे कॉ. मदन जगताप यांनी आपल्या प्रसिद्ध पत्रकाव्दारे कळविले आहे….!