तेल्हारा (प्रतिनिधी)- तेल्हारा तालुका व शहर शिवसेना व युवा सेनेच्या वतीने आज १८ जुनला टॉवर चौक तेल्हारा येथे चायनीज वस्तूंची होळी करून देशाच्या संरक्षणासाठी शाहिद झालेल्या विर जवानांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व चिनच्या भ्याळ हल्ल्याचा निषेध करण्यात आला .
चीन ने पुन्हा एकदा भारतावर हल्ला केला असून आपल्या देशाचे सैनीक शहीद झाले आहेत तरीही अजूनही आपण चीन वस्तूच खरेदी करून चीनची आर्थिक स्थिती मजबुत करत आहोत एक भारतीय नागरिक म्हणून चीन वस्तूंचा बहिष्कार करण्यासाठी शिवसेना व युवसेनेच्या वतीने तेल्हारा येथे चायनीज वस्तूंची होळी करून शाहिद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच चिनच्या भ्याळ हल्ल्याचा निषेध करण्यात आला या वेळी शिवसेना तालुका प्रमुख विजय मोहोड शहर प्रमुख विक्रात शिंदे ,युवासेना जिल्हा प्रवक्ते सचिन थाटे, माजी शहर प्रमुख पप्पूसेठ सोनटक्के ,जिल्हा परिषद सदस्य संजय अढाऊ , रामभाऊ फाटकर, राजेश वानखडे, निलेश धनभर, गोपाल विखे सुनील खारोडे ,प्रज्वल मोहोड ,अजय गावंडे, संतोष साबळे , आखरे, संजय जयस्वाल, विवेक खारोडे, अरुण जिंदे , दिलीप पिवाल अमित घोडेस्वार,पियुष वैष्णव , सागर सारवान , अक्षय गावंडे, अंकुश आठवल, मयूर सुगंधी, विशाल रोदलकार,आकाश चाफे, सुजय माजोळकर, मनोज चाफे ,राहुल मानकर , दिपक गावत्रे ,योगेश सोनोने, विक्की शिंदे आदी शिवसेना युवासेना पदाधिकारी उपस्थित होते