• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 13, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

२७७ अहवाल प्राप्तः ३० पॉझिटीव्ह, एक मयत, १८ डिस्चार्ज

Team by Team
June 19, 2020
in Corona Featured, Featured, अकोला, अकोला जिल्हा, कोविड १९
Reading Time: 1 min read
77 1
0
corona
16
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि. १९ – आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे २७७ अहवाल प्राप्त झाले. त्यातील २४७ अहवाल निगेटीव्ह तर ३० अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान आज सायंकाळी १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील सात जणांना कोविड केअर सेंटर मध्ये निरीक्षणात ठेवण्यात आले आहे तर उर्वरित ११ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच आज एकाचा मृत्यू झाला. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ११३६ झाली आहे. आजअखेर ३३५ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार आजपर्यंत एकूण ८०४२ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ७७२१, फेरतपासणीचे १३४ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १८७ नमुने होते. आजपर्यंत एकूण ८०१८ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ६८८२ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ११३६ आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

आज ३० पॉझिटिव्ह

आज दिवसभरात ३० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. सकाळी प्राप्त अहवालात १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात आठ महिला व सात पुरुष आहे. त्यात अकोट फैल येथील पाच, बाळापूर येथील ४, तर जेतवन नगर, कान्हेरी गवळी, भारती प्लॉट, जुने शहर, मोठी उमरी, बार्शी टाकळी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे ‍रहिवासी आहेत. तर आज सायंकाळी पंधरा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सात महिला व आठ पुरुष आहेत. त्यातील अकोट फैल येथील तिन तसेच सिंधी कॅम्प, धोबी खदान, अशोक नगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित अनिकट, आदर्श कॉलनी, हरिहर पेठ, आंबेडकर चौक, अकोट, बाळापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

एक मयत

दरम्यान काल(दि.१८) रात्री उपचार घेताना एकाच मृत्यू झाला. त्यात हरिहर पेठ, अकोला येथील ८२ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू असून ते कालच दाखल झाले होते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

१८ जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात अकरा जणांना घरी सोडण्यात आले तर सात जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. त्यात आठ पुरुष आणि दहा महिला आहेत. त्यात खदान येथील तीन जण, सिव्हील लाईन, जूने शहर व माळी पूरा येथील दोन, मोठी उमरी, सोनटक्के प्लॉट, गिता नगर, मनर्कणा नगर, तापडीया नगर, शिवनी, गुलजार पुरा, अकोट, बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

३३५ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आता सद्यस्थितीत ११३६ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील ५९ जण (एक आत्महत्या व ५८ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या ७४२ आहे. तर सद्यस्थितीत ३३५ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

संपर्काबाहेरिल पॉझिटीव्ह रुग्ण येणाचे प्रमाण कमी

आज झालेल्या २७७ तपासणी पैकी ३० रुग्ण पॉझिटीव्ह आढळले आहे तर २४७ रुग्ण हे निगेटीव्ह आले आहे. पॉझिटीव्ह रुग्णाचे प्रमाण १०.३८ टक्के आहे. आज आढळलेले सर्व रुग्ण जून्या संपर्कातील किवा पॉझिटीव्ह रुग्णाच्या कुटुंबातील आहे. त्यापैकी पंधरा रुग्ण पीकेव्ही कॉरन्टाइन सेंटरमधील, दोन रुग्ण बार्शीटाकळी येथील कॉरन्टाईन सेंटरमधील आहे. तर पाच रुग्ण अकोट फैल व जेतवन नगर खदान येथील राबविलेल्या मोहिमेअंतर्गत आहे. उर्वरित पाच रुग्ण बाळापूर येथील व तिन रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आले आहे. मागील तिन दिवसापासून राबविण्यात येत असलेल्या स्वॅब संकलन मोहिमेमुळे पुढील संसर्ग रोखण्यात मदत झाली आहे व पुढील धोक्यापासून शहराला वाचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

Tags: अकोलाकोविड १९
Previous Post

वंदे मातरम आपत्कालीन पथकाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर

Next Post

घरोघरी आरोग्य तपासणीत निदर्शनास आलेल्या लोकांचे तिन दिवसात ४९६ स्वॅब जमा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
covid care

घरोघरी आरोग्य तपासणीत निदर्शनास आलेल्या लोकांचे तिन दिवसात ४९६ स्वॅब जमा

चाचणी

87 वर्षाच्या वृध्दाने हरवले कोरोनाला

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.