अकोला,दि.१६- माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेस प्रविष्ट होणाऱ्या जिल्हा/विभाग/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या / सहभागी झालेल्या. खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्यासंदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दि. १५ जून रोजीच्या सुधारीत शासन निर्णयान्वये कळविण्यात आले आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला आहे.
या शासन निर्णयान्वये राज्यात उद्भवलेल्या कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण असामान्य परिस्थितीमुळे व विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता कोणताही खेळाडू क्रीडा गुण सवलतीपासून वंचीत राहु नये या उद्दात हेतुने क्रीडा गुण सवलतीने परिपुर्ण प्रस्ताव दोन प्रतीत शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी शनिवार दि. २० जुन पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला यांचे कडे सादर करावे असे प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी यांनी कळविले आहे.