बाळापुर ( सुनिल गाडगे): बाळापुर तालुक्यातील लोहारा येथील तरुण युवक अ.हारिष अ.रज्जाक देशमुख वय 23वर्षे याचा कळंबा येथील शेत शिवारातील खाबांवरती काम करीत असताना १ वाजताच्या सुमारास ११के.व्ही व्होल्टचा शॉक लागुन जागेवरच मुत्यु झाला व लोहारा येथे ही बातमी वाऱ्यासारकी पसरली. लोहारा,डोंगरगाव,कळंबा, कसुरा येथील नागरिकांनी शेताकडे धाव घेतली.अ.हारिष देशमुख यांच्या पश्चात म्हातारे आई वडील व भाऊ बहीण आहेत.परीवाराचा आधार गेल्या मुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खांचा डोंगर पसरला आहे. घटनास्थळी उरळ येथील पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास करीत आहेत.