अकोट (देवानंद खिरकर)- मका उत्पादक शेतक-यांना आधारभूत हमी भाव मिळावा यासाठी तात्काळ शासकीय मका खरेदी सुरु करावी असे निर्देश आमदार अमोल मिटकरी यांनी आकोटचे तहसिलदारांना दिले.त्यानुसार गुरुवार दि.११ जुन ला मका खरेदीस प्रारंभ होत आहे.
आ.अमोल मिटकरी यांनी स्थानिक खरेदी विक्री संघ कार्यालयास भेट देवून सहकारी संस्थांचे पदाधिकारी व आकोट चे तहसिलदार राजेश गुरव यांचे शेतकरी विषयक बाबींवर चर्चा केली.मका उत्पादक शेतक-यांची मागणी लक्षात घेवून शासकीय मका खरेदी सुरु करण्या बाबत निर्देश दिले.त्यानुसार गुरुवार दि.११ ला मका खरेदीचा शुभारंभ होत आहे.त्याचा लाभ शेतक-यांना मिळणार आहे. मागणीची पूर्तता झाल्याबद्दल आकोट तालुक्यातील शेतक-यांनी समाधान व्यक्त केले.याप्रसंगी अकोला जिल्हा काॕग्रेस व खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष हिदायत पटेल,राष्ट्रवादी काॕग्रेस पार्टीच्या विधान सभा मतदार संघ समितीचे अध्यक्ष जेष्ठ सहकार नेते नानासाहेब हिंगणकर ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शंकरराव चौधरी, राष्ट्रवादी काॕग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष कैलास गोंडचवर,शहराध्यक्ष प्रा नवनित लखोटीया ,संस्थेचे व्यवस्थापक डी.एस.हिंगणकर उपस्थित होते.दरम्यान विधान परिषद निवडणूकीत अविरोध निवडून आल्याबद्दल आ.अमोल मिटकरी यांचा सत्कार करण्यात आला.