• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 9, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

‘कोवीड’साठी दोन खाजगी रुग्णालये अधिग्रहित; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Team by Team
June 9, 2020
in अकोला जिल्हा, Featured, अकोला, कोविड १९
Reading Time: 1 min read
81 1
0
Papalkar meeting
13
SHARES
584
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.९- जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अकोला आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, १८९७ व सार्वजनिक आरोग्य विभाग अधिसुचना अन्वये प्राप्त अधिकारानुसार कोव्हिड रूग्णांना भरती करून त्यांचेवर योग्य ते उपचार करण्याकरिता भारत सरकार यांचे पोर्टलवर नोंदणीकृत असलेले आयकॉन हॉस्पिटल, अकोला व ओझोन हॉस्पिटल अकोला ही दोन्ही खाजगी रूग्णालये नियमानुसार शुल्क आकारून त्यांच्या आस्थापनेवरील कार्यरत आवश्यक वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचेसह कोवीड हॉस्पिटल (Dedicated Covid Hospital) म्हणून अधिग्रहीत करण्यात येत असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत.

त्यासंदर्भातील अटी व शर्तीही आदेशात नमूद केल्या आहेत. त्यानुसार अधिग्रहीत करण्यात आलेल्या आयकॉन हॉस्पिटलचे संचालक यांनी कोव्हिड- १९ च्या रूग्णांकरीता स्वतंत्र प्रवेशाची व्यवस्था करावी तसेच चार ICU Bed व सहा Bed Isolation Unit उपलब्ध करून द्यावे. त्याचप्रमाणे अधिग्रहीत करण्यात आलेल्या Ozone Hospital चे संचालक यांनी कोव्हिड- १९ च्या रूग्णांकरीता स्वतंत्र प्रवेशाची व्यवस्था करावी तसेच तीन ICU Bed व आठ Bed Isolation Unit उपलब्ध करून द्यावे. ICMR यांनी दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

महाराष्ट्र शासनाचे वेळोवळी निर्गमित होणारे आदेश तसेच मार्गदर्शन सुचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे बंधनकारक राहील. उपचारार्थ लागणारा पुरेशा प्रमाणातील तज्ञ डॉक्टर व कर्मचारी/अधिकारी वर्ग २४x ७ नियमितपणे उपस्थित ठेवावा लागेल. याप्रमाणे अधिगृहीत करण्यात आलेल्या दोन्ही रूग्णालयाने आदेशात नमुद केल्याप्रमाणे जिल्हा शल्यचिकित्सक अकोला यांचेकडे सुपूर्द करण्याची कार्यवाही करावी. यारूग्णालयांमध्ये अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी आवश्यकतेप्रमाणे रूग्ण पाठविण्याची व्यवस्था करावी. जिल्हा शल्य चिकित्सक अकोला यांनी उपरोक्त्‍ दोन्ही रूग्णालयामध्ये ज्या व्यक्ती निरिक्षणाखाली ठेवण्यात येतील त्या वैद्यकीय कक्षात तसेच या संदर्भात काम करणारे शासकीय अधिकारी व्यतीरिक्त कोणालाही प्रवेश राहणार नाही. या ठिकाणी आलेल्या व गेलेल्या व्यक्तीच्या आवश्यक नोंदी ठेवण्यात याव्या.

तसेच सदर क्षेत्र हे फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. रूग्णालयाचे व्यवस्थापक यांनी अधिग्रहीत करण्यात आलेल्या रूग्णालयामध्ये विद्युत, पाणी व इतर आवश्यक सुविधा अखंडीत उपलब्ध करून द्याव्या. तसेच रूग्णालयामध्ये एक नोडल अधिकारी नेमावा. या रूग्णालयामध्ये ज्या व्यक्ती निरिक्षणाखाली ठेवण्यात येतील त्यांची माहिती गोपनीय राहील या बाबत संबंधीत वैद्यकीय अधिकारी यांनी दक्षता घ्यावी,असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Tags: अकोलाकोविड १९जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
Previous Post

शासकीय मुकबधिर विद्यालय अकोला येथे प्रवेश देणे सूरू

Next Post

२५५ अहवाल प्राप्तः ४३ पॉझिटीव्ह, एक मयत

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
corona

२५५ अहवाल प्राप्तः ४३ पॉझिटीव्ह, एक मयत

Instruction of bacchu kadu

कमी जोखमीच्या लोकांवरही लक्ष द्या-पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.