*जिल्हा माहिती कार्यालय,अकोला*
*कोरोना अलर्ट*
*आज रविवार दि.७ जून २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-१३८*
*पॉझिटीव्ह-३८*
*निगेटीव्ह-१००*
*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णात १८ महिला व २० पुरुष आहेत.त्यातील आठ जण खदान येथील,चार जण अकोट फ़ैल,चार जण तार फ़ैल, चार जण खडकी, चार जण जिएमसी क्वार्टर येथील तर उर्वरित रजपुतपुरा, अंतरी मलकापूर, हरिहरपेठ, वाशीम रोड, छोटी उमरी नाका, द्वारका नगर मोठी उमरी,गजानन नगर, बापूनगर टेलिफोन कॉलनी, कैलास टेकडी, तपे हनुमान, देशमुख फ़ैल, दहीहांडा,ध्रुव अपार्टमेंट जिल्हा स्त्री रुग्णालया समोरआणि नायगाव येथील प्रत्येकी एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान काल(दि.६) रात्री एका ८५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण रजपुतपुरा येथील रहिवासी असून दि.३१मे रोजी त्यास दाखल केले होते, या रुग्णाचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णाचा समावेश आजच्या अहवालात करण्यात आला आहे.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-७९४*
*मयत-३७(३६+१),डिस्चार्ज-५३१*
*दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-२२६*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*