अकोला: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात 24 मार्च पासून लॉक डाऊन लागू करण्यात आले होते, ह्या कालावधी मध्ये समूह संक्रमण रोखण्या साठी संचारबंदी घोषित करण्यात आली होती व नागरिकांनी अत्यावश्यक काम असल्या शिवाय बाहेर निघू नये असे आवाहन जिल्हा प्रशासना तर्फे करण्यात आले होते तसेच जिल्हाधिकारी ह्यांनी दुचाकी, तीन चाकी व चारचाकी वाहनं चालविण्यावर काही निर्बंध घातले होते व सदर निर्बंधाचा भंग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्याचा सूचना देण्यात आल्या होत्या सदर आदेशानुसार पोलीस अधीक्षक अमोघ गावकर ह्यांचे निर्देशा प्रमाणे शहर वाहतूक शाखेने पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे नेतृत्वात वेळोवेळी धडक मोहीम राबवून कागदपत्र जवळ न बाळगणाऱ्या जवळपास 18 हजार वाहन धारकांवर दंडात्मक कार्यवाही करून लाखोंचा दंड वसूल केला तसेच दिलेल्या निर्देशाचा भंग करून कायदेशीर कागदपत्र जवळ बाळगले नाही म्हणून जवळपास 2 हजार वाहने तात्पुरते जप्त करण्यात आले त्या पैकी जिल्हाधिकारी साहेब ह्यांचा आदेशाचा भंग करून विनाकारण डबल सीट वाहन चालविल्याने 220 वाहन धारकांवर गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले.
नागरिकांनी स्वयं शिस्तीचे पालन करून अकोल्यात वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करून आपल्यावर होत असलेली दंडात्मक व इतर कार्यवाही टाळावी असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी केले आहे