आकोट (शिवा मगर)- महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच रक्तदान शिबिरांची आवश्यकता असल्याची माहिती दिली होती. राज्यात रक्ताचा तुटवडा होण्याची शक्यता असल्याने रक्तदानाचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले होते.त्याला प्रतिसाद देत नगरसेवक मनीष रामाभाऊ कराळे यांच्या नेतृत्वात मनीष कराळे मित्रपरिवाराच्या वतीने आज चंडिकादेवी संस्थान चंडीकापूर तालुका अकोट जिल्हा अकोला येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज सुरक्षित अंतर ठेवत आणि स्वच्छता बाळगत रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले शिबिरात एकूण १०७ रक्तदात्यांनी रक्तदान केले आज दिनांक ३१ मे २०२० ला दुपारी ४:०० ते रात्री १०:०० वाजेपर्यंत या कालावधीत हे शिबिर संपन्न झाले.
कोरोना परिस्थिती पाहता राज्यात आरोग्य विभागाला रक्त पुरवठा कमी पडण्याची शक्यता असल्याकारणाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एका दिवसांच्या या शिबिरात रक्तदात्यांकडून अत्यंत सुरक्षितपणे त्यांची आवश्यक ती काळजी घेत रक्तदान करून घेतले आहे.शिवाय यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगबाबतही विशेष काळजी घेतली गेली आहे.तसेच यावेळी रक्तदात्यांची गर्दी पाहून दोन रक्तदात्यांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यात आले होते एकावेळी पाच याप्रमाणे रक्तदान करण्यात आले.मनीष कराळे मित्रपरिवराच्या वतीने आवश्यक अशी अतिस्वच्छता पाळत शिबिर स्थळी उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला सॅनिटायजर ने स्वच्छ करत व वेळोवेळी मास्क,दुपट्टा लावण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार यावेळी तंतोतंत पालन करण्यात आले.राज्यात दररोज साधारण पाच हजार रूग्णांना रक्ताची आवश्यकता असते विविध शस्त्रक्रिया आणि आजारी रूग्णांना रक्ताची गरज असते. कोरोनामुळे नियमित चालणाऱ्या रक्तदान शिबिरांना फटका बसला आहे.शिवाय,उन्हाळी सुट्टीतील अनेक मोठे रक्तदान शिबिर कोरोनामुळे आयोजितच केले गेले नाहीत.त्यामुळे राज्यात मोजकाच रक्त साठा शिल्लक असल्याची माहिती स्वतः आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.
शिवाय,छोट्या स्तरावर रक्तदान शिबिरांच्या आयोजनाचे आवाहनही केले होते.यामुळे या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिरात बी.पी.ठाकरे रक्तपेढी अकोला यांनी मोलाचे सहकार्य केले.रक्तपेढीकडून आद.डॉ.तोष्णीवाल सर,रक्तपेढीचे वैद्यकीय सहकारी संतोष सुलताने,गौतम डुकरे,अमोल रेले,दिनेश ठाकूर,जावेद खान यांनी लक्षपूर्वक शिबिराला यशस्वी करण्यात मोलाचे योगदान दिले.
याप्रसंगी या हायजेनिक रक्तदान शिबिराला अकोट तालुक्यातील बहुतांश मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली व आयोजकांनी सोशल डिस्टंसिंगसह अन्य उपाययोजना केल्या त्याबाबत मनीष कराळे मित्रपरिवाराचे त्यांनी कौतुक केले.अश्या रीतीने हे भव्य रक्तदान शिबिर हे संपन्न झाले.शिबिर यशस्वीरीत्या संपन्न करण्यासाठी परिसरातील जेष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनात मनीष कराळे मित्रपरिवार अकोट तसेच चंडीकापूर,वाई,दिवठाणा,वडाळी देशमुख,रंभापुर,सावरा,देऊळगाव,ताजनापूर,वडगाव मेंढे येथील सर्व युवकांनी परिश्रम घेतले.
मनीष कराळे मित्रपरिवारातर्फे गेली दोन महिन्यांपासून गरजूंना धान्य वाटप हा उपक्रम सुरू आहे
वैद्यकीय सेवक,पोलीस प्रशासन,साफसफाई कर्मचारी यांना सहकार्य करा.
घराबाहेर पडू नका शासनाच्या सूचनांचे पालन करून आपण कोरोनाला नक्की हरवू.