अमरावती, दि. 25 : जिल्हा रूग्णालयात प्राप्त अहवालांपैकी आज सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत 14 नागरिकांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यात अद्यापपर्यंत आढळून आलेल्या रूग्णांची संख्या 178 वर पोहोचली आहे.
आज प्राप्त 168 अहवालांपैकी 154 निगेटिव्ह व 14 पॉझिटिव्ह आले.
त्यांचा तपशील खालीलप्रमाणे :
१) वय ३८, पुरुष, मद्रासी बाबा नगर
२) वय २३, महिला, हिरुळपूर्णा
३) वय ३७, पुरुष, गांधीनगर (डॉक्टर)
४) वय ३, बालक, हिरुळ पूर्णा
५) वय ३३, पुरुष, शिवनगर
६) वय ३ महिने, बालिका, ताजनगर (ताजनगर येथे या पूर्वी मयत झालेल्या नागरिकाची नात.)
7) वय १४, महिला, खुर्शीद पुरा
8) वय ११, पुरुष, खुर्शीद पुरा
9) वय ४०, महिला, Mavade plot
10) वय ४६, पुरुष, अचलपूर (डॉक्टर)
11) वय ६०, महिला, शिवनगर
१2)४८, महिला, मसान गंज
13)५५, महिला, मसान गंज
14) ३२, पुरुष, एस आर पी एफ कॅम्प अमरावती
यातील गांधीनगर, तसेच अचलपूर असा पत्ता दर्शविलेल्या व्यक्ती शासकीय डॉक्टर असून, त्यांनी कोविड रूग्णालयात सेवा दिलेली आहे.
काल रात्री व आज कोविड मध्ये दाखल एकूण आठ नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला.
१. ३० वर्षे, महिला , वरुड
२. २३, पुरुष, बडनेरा, कुरेशी नगर
३. २८, पुरुष, लालखडी
४. ६०, महिला, लालखडी
५. मसानगंज येथील ४८ वर्षीय पुरुष
६. एसआरपीफ कॅम्प येथील
२७ वर्षीय पुरुष
७. एसआरपीफ कॅम्प येथील
२९ वर्षीय पुरुष
८. सिंधू नगर येथील ५७ वर्षीय पुरुष
· यानुसार अद्यापपर्यंत ८४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज प्राप्त अहवाल संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात स्थापित प्रयोगशाळेतून प्राप्त आहेत.
000