• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 16, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

२७७ अहवाल प्राप्तः १८ पॉझिटीव्ह,२२ डिस्चार्ज, एक मयत

Team by Team
May 25, 2020
in अकोला, Corona Featured, Featured, कोविड १९
Reading Time: 1 min read
77 1
0
corona
28
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.२५ – आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे २७७ अहवाल प्राप्त झाले. त्यातील २५९ अहवाल निगेटीव्ह तर १८ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. काल (दि.२४) रोजी रात्री आणखी २२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातल्या तिघांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित १९ जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. तर आज एका ४० वर्षीय महिलेचा उपचार घेतांना मृत्यू झाला आहे. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या व्यक्तींची एकूण संख्या ४१५ झाली आहे. तर आजअखेर प्रत्यक्षात १३९ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ४०३८ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ३७८७, फेरतपासणीचे ११० तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १४१ नमुने होते. आजपर्यंत एकूण ३९८४ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ३७३३ तर फेरतपासणीचे ११० व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १४१ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ३५६९ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ४१५ आहेत. तर आजअखेर ५४ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

आज १८ पॉझिटिव्ह

आज सकाळी पॉझिटीव्ह आलेल्या नऊ रुग्णांपैकी चार पुरुष व पाच महिला आहेत. या रुग्णांपैकी तीन जण हे फिरदौस कॉलनी येथील रहिवासी आहेत. तर अन्य महसूल कॉलनी, अण्णाभाऊ साठे नगर अकोट फैल, देशमुख फैल,अकोट फैल, मोहता मिल नानकनगर, गोकुळ कॉलनी भुईभोर गॅसजवळ अकोट येथील रहिवासी आहेत.
तर, आज सायंकाळी पॉझिटीव्ह आलेल्या नऊ रुग्णांपैकी सात पुरुष व दोन महिला आहेत. या रुग्णांपैकी दोन जण हे न्यु राधाकिसन प्लॉट येथील रहिवासी आहेत. तर अन्य रणपिसेनगर, गोरक्षण रोड, पावसाळे ले आऊट कौलखेड रोड, सिंधी कॅम्प, शिवर, बाळापूर व पातुर येथील रहिवासी आहेत.

२२ जणांना डिस्चार्ज

काल (दि.२४) रात्री २२ जणांना डिस्चार्ज केलं. त्यातील तिघांना घरी तर उर्वरित १९ जणांना संस्थागत अलगिकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. संस्थागत अलगिकरणात असलेल्या १९ जणांपैकी १२ पुरुष तर सात महिला आहेत. त्यातील चार जण फिरदौस कॉलनी, दोन जण इंदिरानगर तेल्हारा,दोन जण सोनटक्के प्लॉट जुने शहर, तर उर्वरित गोरक्षण रोड, जुने शहर, आश्रयनगर डाबकी रोड, काळा मारुती जुने शहर, बिर्ला गेट जठारपेठ, खरप, न्यू खेतान नगर, लोहिया नगर, राजीव गांधी नगर, नानकनगर निमवाडी, बेलखेड ता. तेल्हारा येथील रहिवासी आहेत.तर घरी सोडण्यात आलेल्या तिघांत एक पुरुष असून तो लोखंडे ले आऊट मोठी उमरी येथील तर उर्वरित महिला सीता नगर व मुजफ्फर नगर येथील रहिवासी आहेत.

१३९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आता सद्यस्थितीत ४१५ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील २५ जण (एक आत्महत्या व २४ कोरोनामुळे) मयत आहेत. तर काल(दि.२४) रात्री २२ जणांना डिस्चार्ज दिला आहे. आता एकूण व्यक्तींची संख्या २५१ झाली आहे. तर सद्यस्थितीत १३९ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान आजअखेर ३८५४ प्रवासी आले आहेत. त्यापैकी २२०९ गृहअलगीकरणात तर १३८ जण संस्थागत अलगीकरणात असे २३४७ जण अलगीकरणात आहेत. तर १३७२ जणांचा अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर १३५ रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.

Tags: अकोलाकोरोनाकोविड १९
Previous Post

विभागीय जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठक बुधवारी (दि.२७): कृषिमंत्री ना.भुसे अकोला येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार सहभागी

Next Post

अमरावती कोरोना अलर्ट; आज 14 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह एकूण संख्या 178

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
corona-positive

अमरावती कोरोना अलर्ट; आज 14 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह एकूण संख्या 178

Murder

अकोल्यात बापलेकाची तलवारीने वार करून हत्या,गुन्हे शाखेने केले आरोपींना काही तासात जेरबंद

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.